Because of snake friends, life is given to snakes as well as to humans!
सर्पमित्रांमुळे माणसांसह सापांनाही जीवनदान, चार विषारी नाग, दोन बिनविषारी धामन जंगलात सोडले
Dhule News धुळे : सर्पमित्रांमुळे केवळ सापांनाच जीवनदान मिळते असे नाही तर माणसांचाही सर्पदंशाचा धोका टळतो. सर्पमित्र स्वतःचा जीव धोक्यात घालून मानव-प्राण्यांचा जीव वाचविण्याचे महान कार्य करतात. ही देखील एक वेगळ्या प्रकारची समाजसेवाच आहे.
धुळे शहरातील प्रसिद्ध सर्पतज्ज्ञ निर्भय साखला, महिला सर्पतज्ज्ञ काजल शिंदे यांनी चार विषारी नाग आणि दोन बिनविषारी धामन धुळे शहरालगतच्या लळींग कुरणात सोडले. त्यांनी हे सर्प विविध भागातून पकडले होते.
शहरातील वस्त्यांमध्ये, घरांमध्ये साप आढळल्यास सर्पमित्रांना कळविले तर ते त्यांना पकडून त्यांच्या अधिवासात सोडतात. अन्यथा मानव-सर्पात संघर्ष पहायला मिळतो. यातून दोघांच्या जीवाला धोका असतो. त्यामुळे कुठेही साप दिसल्यास सर्पतज्ज्ञ निर्भय साखला 9922295511, 9822273007 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.