Road concreting, costing 20 lakhs, inaugurated by MLA Farooq Shah
रस्ता कॉंक्रिटीकरण, २० लक्ष खर्च, आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ
Dhule News धुळे : शहरातील अल्पसंख्याक भागात मुलभूत सुविधा, रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईन यासाठी आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरीकांचे हाल होत होते. त्या सगळ्या गोष्टींचा आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते, गटारी, पाईप लाईन नाही, यासाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावला आहे.
प्रभाग क्रं. 19 रहेबर बाग येथे शब्बीरनगरच्या रोडपासून ते साजिद मक्कू यांच्या घरापर्यंत रस्ता व साजिद रावसाहेब यांच्या घरापर्यंत रस्ता खराब होता. या भागातील नागरिकांनी यासंदर्भात आमदार फारुख शाह यांना निवेदन देवून मागणी केली होती. तात्काळ दखल घेत आमदार फारुख शाह यांनी आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामासाठी २० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळेस नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी डॉ. नाईक, नगरसेवक आमिर पठाण, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, आसिफ पोपट शाह, कैसर अहमद, अजहर सैय्यद, रिझवान अन्सारी, जिलानी खाटीक, सऊद आलम, साजिद मक्कू फुजेल आझमी, जमील अन्सारी, जुबेर अन्सारी, वाहिद सरदार, सुफियान अन्सारी, इफ्तेकार अन्सारी, जिब्राईल अन्सारी, नोमान अन्सारी, जलील शेख, वकील मणियार, अफजल शेख, इम्रान अन्सारी, कौसर शाह आदी उपस्थित होते. रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आ. फारुख शाह यांचा नागरी सत्कार केला.