Take to the streets to maintain Modi’s dictatorship
मोदींची हुकुमशाही राेखण्यासाठी रस्त्यावर उतरा : काॅग्रेसचे जय भारत सत्याग्रह आंदाेलन
dhule धुळे : काॅग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याकडून संसदेत माेदी व अदाणी यांच्यातील संबंधांबाबत भाषण करण्यात आले. त्यामुळे काेर्टाच्या निकालाचा आधार घेत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. अशा प्रकारे जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने लादले जाण्याची शक्यता आहे. ही हुकुमशाही राेखण्यासाठी जनतेनेही रस्त्यावर उतरले पाहिजे, असे मत प्रदेश काॅग्रेस कमिटीचे प्रवक्ते राजेंद्र वाघमारे यांनी व्यक्त केले.
काॅग्रेसतर्फे भारतभर एप्रिल महिन्यात जय भारत सत्याग्रह आंदाेलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जय भारत सत्याग्रह आंदाेलनाचा भाग म्हणून शुक्रवारी प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांकडून पत्रकार परिषद घेवून आंदाेलनाची माहिती देण्यात आली. याप्रसंगी काॅग्रेसचे प्रवक्ते राजेंद्र वाघमारे, प्रदेश कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील, सरचिटणीस युवराज करनकाळ, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, तालुका कार्याध्यक्ष अशाेक सुडके, डाॅ. दरबारसिंग राजपूत उपस्थित हाेते.
याप्रसंगी वाघमारे यांनी सांगितले की, देशात लाेकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जात आहे. राहुल गांधी यांचे निलंबन म्हणजे सर्व नागरीकांचे निलंबन आहे. विराेधात बाेलणाऱ्यांचे ताेंड बंद करण्याचे काम या माध्यमातून केले जात आहे. राहुल गांधींसारखी स्थिती उद्या आपल्यावरही येवू शकते. देशाला हुकुमशाहीकडे नेण्याचे काम केले जात आहे. त्यांचे व्यक्तव्य काेणत्याही जातीविराेधात नसताना व तक्रारदाराने काेर्टात स्टे मिळविला असताना अचानक स्टे उठवून काही दिवसात निकाल लावून सदस्यत्व रद्द करण्यात आले. कारण राहुल गांधी हे संससेत अदानी यांच्या कंपनीकडे असलेल्या २० हजार काेटींबाबत बाेलले हाेते. त्यांनी बाेलू नये, म्हणून ही सुडाची कार्यवाही करण्यात आली. ते अदानी आणि माेदींमधील संबंध उघड करणार हाेते. अदानीच्या अकरा कंपनीकडून सुरक्षा दलाचे काम केले जाते. त्यामुळे त्यांच्या कंपनीला आलेल्या परदेशी निधीमुळे देशाच्या सुरक्षेला धाेका निर्माण हाेवू शकताे. या प्रकरणाची चाैकशी जीपीसीद्वारे करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र माेदी संयुक्त संसदीय संमितीच्या चाैकशीला तयार नाहीत. त्यांच्याकडून हुकुमशाही पध्दतीने कारभार केला जात आहे.त्याविराेधात काॅग्रेसकडून जय भारत सत्याग्रह आंदाेलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी जिल्ह्यात जय भारत सत्याग्रहांतर्गत हाेणाऱ्या आंदाेलनाची माहिती दिली. त्यात पत्रकार परिषद व जिल्हा परिषद गटनिहाय चाैक सभा घेवून अदानी, माेदींच्या संबंधांची माहिती देणे, ३ एप्रिल रोजी युवक काॅग्रेसतर्फे पत्र पाठविणे, तसेच महिलांंकडूनही दिल्लीत आंदाेलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माेदींना राेखण्यासाठी आम्ही सज्ज
देशात माेदींकडून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. माेदी म्हणजे अदानीचा मुखवटा आहेत. त्याबाबत देश पातळीवर संताप व्यक्त केला जात आहे. लाेकशाही धाेक्यात आहे. तसेच राज्यात महाविकास आघाडी स्थापन केली आहे.आगामी काळातही महाविकास आघाडीतर्फे निवडणुका लढविल्या जातील. त्यासाठी काेणतीही तडजाेड करण्याची तयारी काॅग्रेसची आहे. – कुणाल पाटील, आमदार व प्रदेश कार्याध्यक्ष काॅग्रेस