Rashtriy kutumb labh yojana राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास २० हजारांची आर्थिक मदत
20,000 financial assistance in case of unfortunate death of a family earner
National Family Benifit Scheme कुटुंबातील प्रमुख अणि कमावत्या व्यक्तीचा दुर्दैवाने अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास अशा कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना सुरू केली आहे. राज्याच्या सामाजिक न्याय विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाते. मात्र ही योजना केवळ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना लागू करण्यात आली आहे. रक्ताच्या नात्यातील कोणत्याही एका व्यक्तीचे दारिद्र्य रेषेच्या यादीत नाव असेल आणि वंशावळ जुळत असेल तरी या योजनेचा लाभ घेणे शक्य आहे.
- काय आहे योजना?
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अकस्मात मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या कुटुंबाला एक रकमी म्हणजे केवळ एकदाच २० हजार रुपये आर्थिक मदत मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मृत्यू दिनांकापासून तीन वर्षांपर्यंत अर्ज करता येतो.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता
१) दारिद्र्य रेषेखालील यादीत नाव असणे आवश्यक
२) मृत्यू झालेल्या स्त्री अथवा पुरुषाचा मृत्यू दाखला
३) मृत्यू झालेल्या व्यक्तीचे वय १८ ते ५९ वर्षे
- आवश्यक कागदपत्रे
१) मृत व्यक्तीच्या वयाचा पुरावा- जन्म दाखला, शाळेचा दाखला व इतर
२) मृत्यू दाखला, स्मशानभूमीची पावती
३) रहिवासी दाखला
४) दारिद्रय रेषेखालील दाखला
५) रेशनकार्ड
६) मृत व्यक्तीचे आधार कार्ड
७) अर्जदाराचे आधार कार्ड
८) अर्जदाराचे वैयक्तिक बॅंक पासबुक
९) वारस प्रमाणपत्र
१०) रुपये १००/- च्या स्टॅम्पवर घोषणापत्र आणि इतर कागदपत्रे
- अर्ज कुठे करावा?
आपण वास्तव्यास असलेल्या तालुक्यातील तहसीलदार, संजय गांधी निराधार योजनेचे तहसील कार्यालयात अर्ज जमा करावा. अर्जाचा नमुना तहसील कार्यालयात उपलब्ध आहे.
या योजनांचा लाभ घ्या!














