Crackdown on stamp sellers, state level meeting in Dhule
मुद्रांक विक्रेत्यांचे खच्चीकरण, धुळ्यात राज्यस्तरीय मेळावा
Maharashtra News धुळे : राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळाव्यात महाराष्ट्रातून बहुसंख्येने मुद्रांक दस्तलेखक उपस्थित राहणार आहेत.
मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांचे अनेक वर्षापासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. अनेकवेळा संघटनेतर्फे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री, राज्य सचिव, नोंदणी महानिरीक्षक पुणे, आमदार, पालकमंत्री यांना अनेक निवेदने देऊन व प्रत्यक्ष भेटून मागण्या संदर्भात माहिती दिली. परंतु शासनाने आजपावेतो कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. बनावट मुद्रांकाच्या नावाखाली मुद्रांक घोटाळे, नवनवीन नियम, परिपत्रके काढून मुद्रांक विक्रेत्यांचे खच्चीकरण सुरु आहे. मुद्रांक दस्तलेखकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, मागण्या मान्य कराव्यात व शासनावर दबाव निर्माण व्हावा याकरिता ८ एप्रिल रोजी धुळे येथे सैनिक लॉन्स, संतोषी माता चौक येथे राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. महाराष्ट्रातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखकांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन दिलीप देवरे व रामराव पाटील यांनी केले आहे.
नाशिकरोड स्टॅम्प वेंडर धुळे येथील 8/6/2023 रोजीच्या सदर मेळाव्यासाठी पाठिंबा दर्शवित आहोत व या महाराष्ट्र सरकार कडे विनंती करतो की, राज्याच्या सर्व मुद्रांक विक्रेत्यांची उपासमार करू नका, त्यांचे रोजी रोटीचे साधन अशा जाचक अटी व विक्री मर्यादा लादून हिरावुन घेऊ नका, कारण मुद्रांक विक्रते सन 1950 पूर्वी पासून व त्यापेक्षा जुन्या इंग्रजांचे काळापासून मुद्रांक विक्री करून शासनास महसूल गोळा करून देऊन तुटपुंज्या मनोती त जीवन जगत आला आहे आता तरी त्याला मनोती वाढ करून जीवनदान द्या. जर सरकारला मुद्रांक विक्रेता हळू हळू संपुन टाकायचा असल्यास त्याचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चा प्रश्न पेन्शन चालू करून सोडवावा ही विनंती
नाशिकरोड स्टॅम्प वेंडर धुळे येथील 8/4/2023 रोजीच्या सदर मेळाव्यासाठी पाठिंबा दर्शवित आहोत व या महाराष्ट्र सरकार कडे विनंती करतो की, राज्याच्या परवानाधारक मुद्रांक विक्रेत्यांची उपासमार करू नका, त्यांचे रोजी रोटीचे साधन मुद्रांक विक्रीच्या जाचक अटी व विक्रीची मर्यादा लादून हिरावुन घेऊ नका, कारण मुद्रांक विक्रते सन 1950 पूर्वी पासून व त्यापेक्षा जुन्या इंग्रजांचे काळापासून मुद्रांक विक्री करून शासनास महसूल गोळा करून देऊन तुटपुंज्या मनोतीत जीवन जगत आला आहे आता तरी त्याला मनोती वाढ करून व मुद्रांक विक्री सह इतर शासकीय कामे करण्याची अधिकृत परवानगी देऊन जीवनदान द्या. जर सरकारला मुद्रांक विक्रेता हळू हळू संपुन टाकायचाच असल्यास त्याचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चा प्रश्न पेन्शन चालू करून सोडवावा ही विनंती
नाशिकरोड स्टॅम्प वेंडर धुळे येथील 8/42023 रोजीच्या सदर मेळाव्यासाठी पाठिंबा दर्शवित आहोत व या महाराष्ट्र सरकार कडे विनंती करतो की, राज्याच्या सर्व मुद्रांक विक्रेत्यांची उपासमार करू नका, त्यांचे रोजी रोटीचे साधन मुद्रांक विक्री बाबत जाचक अटी व विक्री मर्यादा घालुन हिरावुन घेऊ नका, कारण मुद्रांक विक्रते सन 1950 पूर्वी पासून व त्यापेक्षा जुन्या इंग्रजांचे काळापासून तुटपुंज्या मनोतीत मुद्रांक विक्री करून शासनास महसूल गोळा करून देत जीवन जगत आला आहे आता तरी त्याची मनोती 10 टक्के पर्यंत वाढऊन व मुद्रांक विक्रीसह इतर शासकीय कामाचे अधिकृत परवाने देऊन जीवनदान द्या. जर सरकारला मुद्रांक विक्रेता हळू हळू संपुन टाकायचाच असल्यास त्याचे कुटुंबाचा उदरनिर्वाह चा प्रश्न पेन्शन चालू करून सोडवावा ही विनंती