532 kg cake on the occasion of Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ५३२ किलोचा केक
Dhule धुळे : येथील युवा दक्ष पत्रकार संघातर्फे राष्ट्रपिता महात्मा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
संयुक्त जयंती उत्सवानिमित्त खान्देशी गायक डीजे फेम समिर शेख, भैय्या मोरे, प्रशांत देसले, मेघा मुसळे, रवी खरे, गोविंद गायकवाड यांचा भीमगितांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. १३ एप्रिल रोजी सायंकाळी धुळे शहरात जिल्हा कारागृहाच्या प्रवेशव्दाराजवळ हा कार्यक्रम होईल. तसेच याच ठिकाणी १४ एप्रिल रोजी सायंकाळी ५३२ किलोचा केक कापून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाणार आहे. केक कापल्यानंतर भीमगितांचा कार्यक्रम होईल.
संयुक्त जयंती उत्सवाच्या कार्यक्रमांना उपस्थित रहावे, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष गौतम पगारे, प्रदेशाध्यक्ष शशीकांत सरदार, सचिव मनोहर वाघ, पत्रकार जाॅनी पवार, बापू बाविस्कर, संदीप करनकाळ, संदीप फुलपगारे आदींनी केले आहे.