I won’t rest until they recover half a crore from bogus teachers!
त्या बोगस शिक्षकांकडून सव्वा कोटी वसूल करीत नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही!
Dhule धुळे : केंद्र शासन पुरस्कृत अपंग एकात्मिक शिक्षण योजने अंतर्गत शिक्षक भरतीत मोठा गैरव्यवहार झाला आहे. या योजनेत बनावट पध्दतीने काम करणाऱ्या शिक्षकांविरूध्द पंकज साळुंखे यांनी गुन्हा दाखल केला आहे.
त्यापैकी सहा विशेष शिक्षकांकडून सव्वा कोटी रुपये वसूल करीत नाहीत तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असा निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठा आघाडीचे नेते पंकज साळुंखे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. या प्रकरणात पंकज साळुंखे यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित शिक्षकांना अटक झाली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले होते. परंतु पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली नाही, याबाबत संशय उपस्थित करीत पंकज साळुंखे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या गैरव्यवहारासंदर्भात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.