Free registration of hundreds of beneficiaries in Jan Arogya Yojana
आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनआरोग्य योजनेतील शेकडो लाभार्थ्यांची मोफत नोंदणी
Dhule Gramin धुळे : धुळे ग्रामीणचे आ.कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्यावतीने ग्रामीण भागातील नागरीकांना मोफत आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा म्हणून जन आरोग्य योजनेंतर्गत धुळे तालुक्यातील शेकडो पात्र लाभार्थ्यांची मोफत नोदणी करण्यात आली आहे. शासनाच्या पडताळणी व मंजुरीनंतर आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचे गोल्डन कार्ड मोफत वितरीत केले जाणार आहे. त्या अनुषंगाने नुकतेच कुसूंबा ता.धुळे येथे मोफत नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला.
ग्रामीण भागातील रुग्णांना आपल्या आजारांवर मोफत उपचार व्हावेत म्हणून आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत 5 लाख रुपयापर्यंत खर्चाचा मोफत उपचार संबधित पात्र रुग्णांवर केला जातो. दरम्यान सदर योजनेसाठी केंद्र सरकारच्यावतीने सर्व्हे करुन पात्र लाभार्थ्यांची गावनिहाय यादी निश्चित करण्यात आली आहे. ग्रामीण भागात आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील लाभार्थी नोंदणी अभावी गोल्डन कार्ड नसल्याने या योजनेपासून वंचित राहत आहेत. त्यामुळे असंख्य रुग्णांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. सदर पात्र लाभार्थी वंचित राहू नये व त्यांना मोफत आरोग्य उपचाराची सोय व्हावी म्हणून आ.कुणाल पाटील यांनी जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्यावतीने मोफत नोंदणी कार्यक्रम हाती घेतला आहे. नुकतीच कुसूंबा ता.धुळे मोफत नोंदणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जवाहर सुतगिरणीचे संचालक डॉ. दत्ता परदेशी, समन्वयक संजय शिंदे, माजी पं. स. सदस्य डिगंबर परदेशी, सामाजिक कार्यकर्ते अश्पाक शेख, प्रा. अमोल शिंदे, सुनिल चव्हाण, रुपेश नहिरे, शरद मानकर, सुधाकर जाधव, संदिप परदेशी, तुषार शिंदे, सुनिल शिंपी आदी उपस्थित होते.
मोफत नोंदणी व वितरण
आ. कुणाल पाटील यांच्या नेतृत्वखाली जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्टच्यावतीने धुळे तालुक्यातील गावागावात मोफत नोंदणी मोहीम राबविली जात आहे. नोंदणीनंतर संपूर्ण ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मंजुरी मिळते.मंजुरी मिळाल्यावर गोल्डन कार्ड सक्रीय होते.सदर गोल्डन कार्ड तयार करुन ते आ.पाटील यांच्यावतीने मोफत वितरीत केले जाणार आहे.त्यामुळे नागरीकांचा खर्च वाचला आहे.दरम्यान आतापर्यंत कुसूंबा, आर्वी, सायने, निमखेडी, कोठारे,बोरसुले, बोरीस,वडणे, बेहेड,रामी,चिंचवार,सैताळे, लामकानी आदी गावांमध्ये मोफत नोंदणी करण्यात आली आहे.नोंदणीवेळी लाभार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.