इर्शाद जहागीरदार यांनी केली संदेश भूमी येथे पाण्याची सोय, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
Dhule धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सामाजिक बांधीलकीच्या प्रेरणेतून इर्शादभाई जहागिरदार यांच्यातर्फे धुळे शहरातील ऐतिहासक संदेश भूमी येथे पाण्याची टाकी व बोअरवेल सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या कामाचा सरोज कदम यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागिरदार, अॅड. मधुकर भिसे, अॅड. संतोष जाधव, संदेश भूमी समितीचे अध्यक्ष आनंद सैंदाणे, संजय चव्हाण, रवींद्र नगराळे, रवींद्र वाघ, गणेश शिंदे, पंकज भामरे, विजय सूर्यवंशी, जी. के. गावडे, संजू अहिरे, संतोष सूर्यवंशी, रवी शिंदे, कैलास अमृतसागर, वामन जाधव, योगेश बैसाणे, गुड्डू शेख, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा सरोज कदम, संगीता खैरनार, वर्षा सूर्यवंशी, किरण सूर्यवंशी, फर्जना शाह उपस्थित होते.
दरम्यान, इर्शाद जहागिरदार व बहुजन विद्रोही पत्रकार संघ यांच्यातर्फे धुळे शहरातील जेल रोड या ठिकाणी महामानव विश्वरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त१३२ विद्यार्थ्यांना शालेयपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागिरदार, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, बहुजन विद्रोही पत्रकार संघाचे अध्यक्ष दीपक खैरनार, खानदेश मैदानाचे संपादक मनोज गर्दे, श्रमराज्याचे संपादक अतुल पाटील, माजी नगरसेवक अनिल दामोदर, सरोज कदम, संगीता खैरनार, वर्षा सूर्यवंशी, किरण सूर्यवंशी, फर्जना शहा उपस्थित होते.