Wife’s lover was invited to drink and stoned to death
पत्नीच्या प्रियकराला दारू पिण्यासाठी बोलावले अन् दगडाने ठेचून ठार मारले
Jalgaon Crime रावेर : पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजल्यावर पतीने त्या मित्राला पार्टी करण्यासाठी बोलावले आणि त्याचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना जळगाव जिल्ह्याच्या रावेर तालुक्यात सायबुपाडा गावात घडली.
बेपत्ता असलेल्या आदिवासी तरुणाचा दुसऱ्या दिवशी गावापासून काही अंतरावर एका नाल्यात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दगडाने डोके ठेचून तरुणाचा निघृणपणे खून केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी शनिवारी रावेर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय रेमसिंग पावरा (वय ३०, रा. सायबुपाडा ता. रावेर) असं मृत तरुणाचं नाव आहे. अवघ्या २४ तासांच्या आत रावेर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी या गुन्ह्याचा उलगडा केला असून खून करणाऱ्या संशयिताला अटक केली आहे. किनेश सजन पावरा (वय २८) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. संशयिताच्या पत्नीसोबत मयताचे अनैतिक संबंध होते, त्यातूनच हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.
सायबुपाडा या गावात संजय हा पत्नी व भाऊ, वहिणी यांच्यासोबत एकत्र राहत होता. निमड्या शिवारात त्यांची शेती आहे. शेतीकामात वडिलांना संजय हा मदत करत होता. तो शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता घराच्या बाहेर पडला. मात्र पुन्हा रात्री घरी परतला नाही. शेतात मुक्कामी थांबला असेल, या विचाराने भावाने त्याचा शोध घेतला नाही.
दुसऱ्या दिवशी शनिवारी सकाळी संजय हा शेतात न आल्याने त्याचे वडील रेमसिंग पावरा यांनी त्याच्या मोबाईलवर फोन लावला. मात्र फोन बंद येत होता. त्यानंतर त्यांनी संजय याचे घर गाठले, मात्र याठिकाणी संजय याची पत्नी अंगणवाडी येथे स्वयंपाकाच्या कामावर गेली होती. त्यामुळे रेमसिंग पावरा हे त्याच्या लहान मुलगा मकराम याच्याकडे आले, त्यांनी संजयबाबत विचारणा केली, मात्र त्यालाही संजयबाबत कुठलीही माहिती नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर रेमिंसग पावरा हे मुलगा संजय याचा शोध घेण्यासाठी निघाले असता, घरापासून अर्धाकिलोमीटर अंतरावर सायबुपाडा निमड्या रस्त्यावर संजय याची दुचाकी मिळून आली. पुन्हा रेमसिंग हे दुसऱ्या गावात संजय याचा शोध घेण्यासाठी गेले, याचदरम्यान मकराम याला नाल्याजवळ एक व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला असल्याची माहिती मिळाली. रेमसिंग व मकराम या दोघांनी घटनास्थळ गाठले असता, मयत व्यक्ती हा संजय असल्याचे निष्पन्न झाले. रेमसिंग यांनी घटनास्थळीच हंबरडा फोडला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, रावेरचे पोलीस निरीक्षक कैलास नगरे, पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे यांनी धाव घेतली. घटनास्थळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात संजय याची दगडाने ठेचून खून केल्याचे समोर होते. याप्रकरणी मयत संजय याचे वडील रेमसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरुन रावेर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत संजय याचं शेवटचं फोनवर संशयित किनेश पावरा याच्यासोबत बोलणं झालं होतं. त्यानुसार रावेर पोलीस स्टेशनचे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने तपासाला वेग दिला आणि संशयित किनेश पावरा यास रविवारी अटक केली.
संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मयत आणि संशयित हे दोघेही एकाच ठिकाणी एकमेकांच्या शेजारी राहतात. मयत संजय याचे किनेश याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. घटनेच्या एक ते दोन दिवसांपूर्वी किनेश याने त्याच्या पत्नीसोबत संजय यास रंगेहाथ पकडले होते, त्याचा राग किनेश याच्या डोक्यात होता. त्यानुसार ७ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास किनेश याने संजय यास फोन केला, तुला भेटून बोलायचे आहे, सोबत दारू पिऊ, असे सांगत बोलावले. संजय गेला, याठिकाणी दोघांनी सोबत मद्यप्राशन केलं, यावेळी किनेशचा डोक्यात असलेला राग उफाळून आला व त्याने संजय याचा डोक्यात दगड टाकून खून केला, अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. घटनेचा पुढील पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे हे करीत आहेत.

Very nice post. I definitely appreciate this site. Stick with it!