The roads in Dhule taluka will be transformed
धुळे तालुक्यातील रस्त्यांचा होणार कायापालट
Dhule News धुळे : ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून महाविकास आघाडी सरकारच्या काळात धुळे तालुक्यातील रस्त्यांच्या कामांसाठी सुमारे 41 कोटी 77 लक्ष रुपये मंजुर करण्यात आले होते. मात्र विद्यमान सरकारने कामांना स्थगित दिली होती. त्यानंतर आ. कुणाल पाटील यांनी पुन्हा पाठपुरावा करुन त्या रस्त्यांच्या कामांची स्थगिती उठविण्यात आल्याने धुळे तालुक्यातील रस्ते विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.
धुळे तालुक्यात रस्त्यांची कामे व्हावी आणि खराब झालेली रस्त्यांची सुधारणा करण्यात यावी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकार्यांच्या वारंवार बैठका घेवून रस्त्यांच्या कामांचा प्रस्ताव तयार करुन शासनास सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तालुक्यातील रस्ते सुधारणा करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला होता. सदर कामांना मंजुरी मिळावी आणि त्यांचा अर्थसंकल्पात समावेश व्हावा म्हणून आ. कुणाल पाटील यांनी वारंवार मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा केला होता. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारच्या काळात धुळे तालुक्यातील रस्त्यांच्या सुधारणा कामासाठी एकूण 41 कोटी 77 लक्ष रुपये मंजुर करण्यात आले होते.
दरम्यान, राज्यातील सत्ता बदलानंतर या कामांना स्थगिती देण्यात आली होती. सदरची स्थगिती उठविण्यासाठी आ. कुणाल पाटील, विद्यमान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली होती. त्यानुसार धुळे तालुक्यातील 41 कोटी 77 लक्ष रुपयांच्या रस्त्यांच्या कामांची स्थगिती उठविण्यात आली असल्याचे आ. कुणाल पाटील यांनी सांगितले आहे. स्थगिती उठविण्यात आल्याने धुळे तालुक्यातील रस्त्यांच्या कामांना चालना देण्यात येईल. परिणामी रस्ते परीसरातील शेतकरी, प्रवासी, वाहनधारकांची गैरसोय दूर होणार आहे. दरम्यान स्थगिती उठविल्याबद्दल आ. कुणाल पाटील यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत.
स्थगिती उठविलेले रस्ते
धुळे ते बिलाडी रस्ता सुधारणा करणे (1कोटी 30 लक्ष), कौठळ फाटा ते कापडणे (2 कोटी 15 लक्ष), बाबरे ते जळगाव जिल्हा हद्द दरम्यान स्लॅबड्रेनचे बांधकाम करणे (2 कोटी 50 लक्ष), कापडणे ते कौठळ रस्ता सुधारणा करणे (3 कोटी 50 लक्ष ), कौठळ फाटा ते तालुका हद्द रस्ता सुधारणा करणे (3 कोटी 50 लक्ष), बोरीस ते निकुंभे रस्ता सुधारणा करणे (2 कोटी), सायने ते देवभाने रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 50 लक्ष), मेहेरगाव ते खेडे रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 35 लक्ष), निमडाळे ते खेडे रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 50 लक्ष), वेल्हाणे ते आर्वी-पारोळा रस्ता सुधारणा करणे (76 लक्ष), शिरढाणे ते नावरा रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 28 लक्ष), धमाणे ते बिलाडी रस्ता सुधारणा करणे (1 कोटी 90 लक्ष), बिलाडी ते निमखेडी रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 85 लक्ष), बोरकुंड ते झोडगे रस्ता सुधारणा करणे (2 कोटी 85 लक्ष), मोहाडी प्र. डा. ते जिल्हा हद्द रस्ता सुधारणा करणे (95 लक्ष), निमडाळे-वार-कुंडाणे रस्ता सुधारणा करणे, लहान पुल, पाईप मोरीचे बांधकाम करणे (2 कोटी 85 लक्ष), नावरा गाव रस्ता कॉक्रीटीकरण करणे (2 कोटी 18 लक्ष), मांडळ गावात काँक्रीट रस्ता करणे (2 कोटी 85 लक्ष) या रस्त्यांच्या कामाची स्थगिती उठविण्यात आली आहे.