Shame, shame! Sharm Modi government! Nationwide movement of Congress in Pulwama case
शर्म करो, शर्मा करो! मोदी सरकार शर्मा करो! पुलवामा प्रकरणी काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन
Dhule News धुळे : माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोटानंतर काॅंग्रेस पक्ष आक्रमक झाला असून, सत्तेसाठी पुलवामा घडविणाऱ्या मोदींनी पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी करीत सोमवारी देशव्यापी आंदोलन करण्यात आले. धुळे शहरात काॅंग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार घोषणाबाजी केली.
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी दोन दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत पुलवामा हल्ल्यावरून मोदी सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यांच्या या आरोपांनंतर देशाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या आंदोलनाबाबत काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांनी भूमिका मांडली. (Video पहा)
सत्यपाल मलिकांनी नेमकं काय आरोप केले?
पुलवामा हल्ल्याबाबत सत्यपाल मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. “पुलवामा हल्ल्यापूर्वी सीआरपीएफनं एअरक्राफ्टची मागणी केली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने नकार दिला. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी मी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली. पुलवामा हल्ला आपल्या चुकीमुळे घडलाय असं मी त्यांना सांगितलं. पण त्यांनी मला शांत राहण्यास सांगितलं” , असं ते म्हणाले होते.
काय म्हणाले शरद पवार?
काश्मीरमधील पुलवामा येथे आपल्या ४० जवानांची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. ते भाजपाच्या विचाराचे होते. भाजपानेच त्यांनी नियुक्त केली होती. आता राज्यपालपदाची मुदत संपल्यानंतर त्यांनी खरी परिस्थिती सांगितील. आपल्या सैन्याला एअरक्राफ्ट आणि आवश्यक ती साधनं वेळेवर न दिल्याने ही घटना घडली. तसेच पंतप्रधांनी त्यांना या विषयावर शांत राहायला सांगितल्यांचही, ते म्हणाले. ही सत्य परिस्थिती होती, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.