Welfare of Human Life through Divine Realization : Sant Sukhdev Singh
ईश्वरीय अनुभूतिद्वारे मानवी जीवनाचे कल्याण : संत सुखदेवसिंह
Dhule धुळे : ईश्वरीय अनुभूतिद्वारे मानवी जीवनाचे कल्याण करावे, असे उपदेश संत सुखदेवसिंह यांनी केले.
४३ व्या खान्देश निरंकारी सत्संग समारोह प्रसंगी मुख्य मंचावरून भाव व्यक्त करतांना संत निरंकारी मंडळाचे सेक्रेटरी संत सुखदेवसिंह यांनी हे विचार मांडले.
निरंकारी मंडलाच्या सदगुरु माता सुदीक्षा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे येथे रविवारी विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या मैदानावर 43 वा खान्देश निरंकारी सत्संग समारोह झाला. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील २३ शाखांमधील हजारो अनुयायायी उपस्थित होते. सदगुरु माताजी यांचा संदेश देताना सुखदेवसिंह म्हणाले, युगानुयुगे आध्यात्मिक जागृती संतांनीच दिली व मानवाचा उध्दार केला. ब्रह्मानुभूती,आत्मिकता सद्गुरुमुळे प्राप्त होते. राजा जनकाचे उदाहरण देऊन परमेश्वर प्राप्तीसाठी शरिराचा आकार, रंग, जात, धर्म याची गरज नसते. केवळ शुद्ध भावना देवास आवडते.
सत्संग कार्यक्रम स्थळी भाविक भक्तांसाठी संत निरंकारी प्रकाशन साहित्य, निरंकारी प्रदर्शनी, अल्पोपहार, लंगर प्रसादासह विविध प्रकारचे स्टाॅल लावण्यात आले. यांचा आनंद संतांनी घेतला. कविता, गीत व विचारांच्या माध्यमातून सर्व भाषेतून संदेश प्रसारित करण्यात आला. मंच संचलनाठी सर्वप्रथम रिंकी साबनानी, रत्नाकर मोरे, राजकुमार वाणी यांनी सेवा दिली.
सत्संग कार्यक्रम स्थळी विशाल मैदानात संत निरंकारी प्रदर्शनीत संपूर्ण खान्देश संत इतिहास, झोन अंतर्गत सामजिक उपक्रम, वननेस वन, रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान, श्रमदान, स्वच्छ जल-स्वच्छ मन, आपात्कालीन परिस्थिती या कार्याचा आढावा घेतला.
सत्संग कार्यक्रमाच्या आयोजन, नियोजनासाठी धुळे झोन अंतर्गत जळगाव क्षेत्रातील सर्व सेवादल युनिटचे अधिकारी, सेवादल सदस्य यांनी परिश्रम घेतले. तसेच वार एन एस चे सदस्य, झोनचे सदस्य यांचे देखील मोलाचे योगदान राहिले.
कार्यक्रमच्या शेवटी धुळे झोनचे क्षेत्रीय प्रभारी हिरालाल पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.