What did Ashok Chavan say about Maratha reservation?
मराठा आरक्षणावर काय म्हणाले अशोक चव्हाण?
Nanded News Updates नांदेड : मराठा आरक्षणावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. सर्वोच्च न्यायालयाने पिटिशन रद्द केल्याबद्दल सरकारला काही गांभीर्य आहे का? असा प्रश्न माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला. ते नांदेड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आला आहे. याचे मला खूप वाईट वाटत आहे. सर्वसामान्य मराठा समाजातील नागरिकांच्या भावना या निर्णयाशी जोडल्या गेल्या होत्या. मराठा समाजाला एक शेवटची आशा होती; पण सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण पुनर्याचिका रद्द केल्याच्या निर्णयामुळे मला खूप दुःख झाल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज नांदेडमध्ये दिली.