Bhagdad to BJP, Prof. Suresh Desale in Congress
भाजपाला भगदाड, प्रा.सुरेश देसले काँग्रेसमध्ये
Dhule धुळे : जिल्हयासह शिंदखेडा तालुका भारतीय जनता पक्षाला मोठे भगदाड पडले आहे. शिंदखेडा तालुक्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी पंचायत समिती सभापती प्रा.सुरेश दयाराम देसले यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे शिंदखेडा तालुक्यातील काँग्रेस पक्षात चैतन्य निर्माण झाले असून भाजपाला चांगलाच दणका बसला आहे.
वाढती महागाई, शेतीमालाला भाव नाही, शेतकरी विरोधी धोरणामुळे उध्वस्त होणारा शेतकरी, छोट्या व्यापार्यांचे नुकसान, गोरगरीब, मध्यमवर्गीय लोक महागाई आणि भाजपाच्या हुकूमशाही धोरणाला कंटाळले आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षात सच्चा कार्यकर्त्याची व पदाधिकार्यांची घुसमट होत आहे. सामान्य जनतेप्रती त्यांचा आवाज दाबला जात आहे. त्यामुळे भाजपाला गळती लागण्यास सुरुवात झाली आहे. धुळे जिल्हयाचे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि शिंदखेडा तालुका पंचायत समितीचे माजी सभापती प्रा.सुरेश देसले यांनी भाजपाची ध्येय धोरणे आणि कार्यपध्दतीवर नाराजी व्यक्त करीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
२५ एप्रिल रोजी महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते बालमुकूंद बुटू पाटील यांनीही काँग्रेमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, माजी नगराध्यक्ष दिपक देसले, माजी विरोधी पक्षनेता सुनिल चौधरी, माजी नगरसेवक दिपक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.सुरेश देसले यांच्या प्रवेश झाला.
यावेळी बोलतांना आ. कुणाल पाटील आ.कुणाल पाटील यांनी सांगितले कि, देशाची आणि राज्याची एकूण परिस्थिती पहाता लोकांचा भाजपावरील विश्वास उडाला आहे. वाढलेली महागाई आणि भ्रष्ट्राचार या मुळे जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात येणार्या नेत्यांची संख्या वाढायला सुरुवात केली आहे. धुळे जिल्हा हा काँग्रेसचा बालेकील्ला म्हणून ओळखला जातो आणि या बालेकील्ल्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहे. प्रा.सुरेश देसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचे काँग्रेस पक्षात मी मनापासून स्वागत करतो असे सांगत प्रा. देसले यांच्या प्रवेशमुळे शिंदखेदा तालुक्यातील काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे आणि येणार्या सर्व निवडणूका महाविकास आघाडी बहूमताने जिंकणार असल्याचा विश्वास आ. पाटील यांनी व्यक्त केला.
भाजपावर नाराजी व्यक्त करीत प्रा. सुरेश देसले यांनी सांगितले की, जो सन्मान काँग्रेसमध्ये सर्वसामान्य कार्यकता आणि पदाधिकार्यांना मिळतो तो सन्मान भाजपामध्ये अजिबात मिळत नाही. आज परिस्थिती अशी आहे, शेतकरी, गोरगरीब जनता, मोलमजुरी करणार मजूर, मध्यमवर्ग श्रमजिवी वर्गात असुरक्षिततेची भावना आहे. त्यामुळे भाजपापेक्षा जुन ते सोन म्हणून काँग्रेसच चांगली असा मतप्रवाह जनतेमधुन पुढे येत आहे.
यावेळी सेवा सोसायटी तसेच विविध संघटना सामाजिक संस्थेवर नियुक्ती झाल्याबद्दल काँग्रेस पदाधिकार्यांचा आ. कुणाल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रवेश सोहळाप्रसंगी काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, माजी नगराध्यक्ष दिपक देसले, माजी विरोधी पक्षनेता सुनिल चौधरी, माजी नगरसेवक दिपक अहिरे, प्रफ्फूल सिसोदे, शिंदखेडा बाजार समितीचे माजी सभापती दिलीप पाटील, अशोक पाटील, इंटक जिल्हाध्यक्ष प्रमोद सिसोदे, उपाध्यक्ष समद शेख, माजी नगरसेवक दिनेश माळी, माजी नगरसेवक सुमित जैन, माजी नगरसेवक किरण थोरात, माजी जि. प. सदस्य प्रा. सी. व्ही. पाटील, दिलीप भामरे, कैलास भामरे, प्रकाश पाटील, गजेंद्र भामरे, हाजी शब्बीर खॉ पठाण, सचिन देसले, कैलास माळी, सरपंच प्रा. जी. बी. बोरसे, चेअरमन प्रा. ए. व्ही. पाटील आदी उपस्थित होते.
व्यक्तीगत स्वार्था साठी कुणी ही आणि किती ही लोक भाजपा सोडून गेले तरी भाजपाला काहीचं फरक पडणार नाही. कारण भाजपा आज जनतेच्या मनामनात शिरली आहे.भाजपा ही जनतेच्या हिता साठी कार्य कराणारा पक्ष आहे. येथे स्वार्थी, संधिसाधु, मतलबी लोकांना थारा नाही.
जय हो नमो नमो. जय भाजया.
भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य जनतेच्या हिता साठी कार्य करणारा पक्ष आहे. येथे स्वार्थी, मतलबी,संधीसाधु लोकांना थारा नाही. पक्ष सोडणार्या नेत्या साठी रस्ता मोकळा आहे. जनता भाजपा सोबत आहे. मोदी जी सोबत आहे. आता देव, देश, धर्म हिता साठी भाजपा शिवाय पर्याय नाही हे जनतेला पटले आहे.
जय हो नमो नमो. जय भाजपा,
भारत माता की जय.