160 units of blood collection in Dhule in Sant Nirankari Mission’s worldwide Maha Blood Donation Campaign
संत निरंकारी मिशनच्या विश्वव्यापी महा रक्तदान अभियानात धुळ्यात १६० युनिट रक्त संकलन
Dhule News धुळे : मानवतावादी बाबा गुरबचनसिंह यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २४ एप्रिल हा दिवस निरंकारी मिशनतर्फे देश-विदेशामध्ये ‘मानव एकता दिवस’ या रूपात साजरा केला जातो. या दिवश रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी मानव कल्याणार्थ संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल धुळे झोन ३६-बी अंतर्गत संत निरंकारी सत्संग भवन, साक्री रोड, धुळे याठिकाणी भव्य महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले .
शिबीराचे उदघाटन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे (भा.प्र.से.) व सहाय्यक जिल्हधिकारी सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात एकुण १६० युनिट रक्त संकलन करण्यात आले. धुळे शाखेच्या वतीने धुळे क्षेत्राचे प्रभारी हिरालाल पाटील यांनी स्वागत सत्कार करुन उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
तसेच नगरसेवक योगेश ईशी, प्रफुल्ल पाटील यांच्यासह अनेक मुस्लीम बांधव उपस्थित होते. रमजान ईदचा प्रसाद म्हणून शिरखुरमा रक्तदात्यांना वाटत केला. रक्तदात्यांसाठी अल्पोहार, चहापानाची व्यवस्था केली होती. रक्त संकलनासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालय सरकारी रक्त पेढीचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.
उदात्त लोक कल्याणकारी हेतूने आयोजित या अभियानामध्ये सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मानवतेच्या दिव्य शिकवणुकीची छाप दिसून येईल. जिचा अंगीकार करून निरंकारी जगतातील समस्त भक्तगण प्रेरणा प्राप्त करून आपले जीवन कृतार्थ करत आहेत. या महा शिबीराच्या आयोजन नियोजनासाठी सेवादल अधिकारी डॉ. कानडे, मिलिंद बाविस्कर यांच्यासह सेवादल सदस्य, एसएनसीएफ, एनवायएस व साध संगत यांनी परिश्रम घेतले.