Former minister Rohidas Patil inaugurated the bridge over Kanoli river
कनोली नदीवरील पुलाचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
Dhule News धुळे : आमदार कुणाल पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या बोरकुंड -नाणे रस्त्यावरील पुलाचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सदर पुल कनोली नदीवर असल्याने या कामामूळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.
धुळे तालुक्यातील बोरकुंड ते नाणे रस्त्यावर कनोली नदीवर पुल नसल्यामुळे शेतकरी,वाहनधारक व प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असे. कनोली नदीला पावळ्यात महापूर आल्यावर अनेक दिवस वाहतूक खंडीत होत असते परिणामी शेतकर्यांची शेतीची कामे खोळंबत असे तसेच वाहनधारक व प्रवाशांचाही प्रवास खंडीत होत असे. त्यामुळे या नदीव पुल व्हावा म्हणून आ.कुणाल पाटील यांनी पाठपुरावा करुन त्यासाठी एकूण चार कोटी रुपयांचा निधी मंजुर करुन आणला होता. सदर पुलाचे बांधकाम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत मंजुर केले होते. पुलाच्या कामाचे लोकार्पण मंगळवारी सकाळी १० वाजता माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मांडळ ग्रामपंचायतीच्या घंटागाडीचेही लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले.
लोकार्पण कार्यक्रमाला बाजार समितीचे माजी सभापती गुलाबराव कोतेकर, बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार, पं. स.चे माजी सभापती भगवान गर्दे, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, बाजार समितीचे संचालक योगेश पाटील, विशाल सैंदाणे, रावसाहेब पाटील, बाजार समितीच्या संचाललिका तथा मांडळ सरपंच नयना पाटील, रुपाभाऊ देवरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष भगवान पाटील, जि. प. सदस्य अरुण पाटील, ज्येष्ठ नेते भिमसिंग राजपूत, पप्पू भदाणे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना विभागाचे उपअभियंता व्ही. एम. पाटील, शाखा अभियंता डी. व्ही. सुर्यवंशी, देविदास माळी, राजीव पाटील, हर्षल पाटील, सरपंच दगडू आढावे, राजेंद्र भदाणे, कृष्णा पाटील, राजेंद्र जाधव, मधुकर पाटील, चंद्रकांत माळी, बापू खैरनार, प्रविण माळी, अमोल राजपूत, गजेंद्र राजपूत, संजय राजपूत, भाऊसिंग ठाकरे, बालू राजपूत, माजी सरपंच गैबू माळी, गुलाब महाजन, शालीग्राम माळी, प्रशांत माळी, आधार माळी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला बोरकुंड, रतनपुरा, नाणे, सिताणे, नंदाळे परिसरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.