Through the film ‘The Kerala Story’, thousands of tribal women urged to promote inter-caste, inter-religious marriages, against the noses of caste poisoners
‘द केरला स्टोरी’ चित्रपटाद्वारे जातीय द्वेष पेरणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून हजारो आदिवासी महिलांनी धरला आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचा आग्रह
Dhule News धुळे : देशभरात ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाद्वारे जातीय द्वेष पेरण्याचे कटकारस्थान जोरात सुरू असताना धुळे जिल्ह्यात हजारो आदिवासी महिलांनी एकत्र येत आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहाला प्रोत्साहन देण्याचा आग्रह धरलाय आणि तसा ठरावही केला.
साक्री येथे सत्यशोधक महिला सभेच्या वतीने महिला परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेच्या अध्यक्षपदी निलाबाई वळवी होत्या. तर उद्घाटन साजूबाई गावित यांनी केले. सूत्रसंचालन शितल गावित यांनी केले.
या परिषदेपुढे कॉम्रेड मेधा थत्ते, कॉम्रेड प्रतिमा परदेशी, लालाबाई भोये, होमाबाई गावीत, लिलाबाई अहिरे, पवित्राबाई सोनवणे, शांताबाई गावित, जमुनाबाई ठाकरे, स्मिता आंबरे, लिलाबाई मोरे यांची प्रमुख भाषणे झाली.
परिषदेत झालेले ठराव असे
स्रि-पुरुष समानतेसाठी विशेष कायदा करा.
गरोदर स्त्रिया, बालकांचे कुपोषण थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न करा.
सर्व स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न यासंबंधी विशेष तजवीज करा.
सरकारी दवाखाने अद्ययावत करा.
आदिवासी विरोधी वन कायदा रद्द करा.
वन्य प्राण्यापासून संरक्षण मिळावे.
वन्य प्राण्यांनी शेत पिकांचे नुकसान केल्यास त्याची भरपाई मिळाली पाहिजे.
शेतकरी या व्याख्येत महिलाही आल्या पाहिजेत. म्हणून महिलांच्या नावाने शेती करा.
शेती सिंचन सुविधा वाढवा.
अखंडित व स्वस्त दरात वीज द्या.
दिल्ली येथील सरहद्दीवरील शेतकऱ्यांचे प्रदीर्घकाळ आंदोलन झाले, ते आंदोलन मिटवताना पंतप्रधान मोदी यांच्या सरकारने जी आश्वासन दिली होती, त्याची कायदेशीर पूर्तता करा.
स्त्रियांवरील हिंसेचा बंदोबस्त करा.
डाकीन प्रथाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा.
बिल्कीस बानो प्रकरणातील गुन्हेगारांना पुन्हा अटक करा. दिल्लीत उपोषण करणाऱ्या कुस्तीगीरांना न्याय द्या.
रेशन व्यवस्था बळकट करा.
महागाई कमी करा आणि बेरोजगाराना नोकऱ्या द्या.
ऊस तोडणी मजुरांना सक्षम महामंडळ स्थापन करून न्याय द्या.
आंतरराज्य मजूर स्थलांतर विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करा.
२५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस स्री मुक्ती दिन म्हणून साजरा करा.
पवन ऊर्जा, समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन या नावाने बळजबरीने केले जाणारे भूसंपादन थांबवा.
नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा.
जात निहाय जनगणना सुरू करा.
संविधान वाचवा -देश वाचवा.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बोधचिन्हातून शनिवारवाडा वगळा. अखिल भारतीय साहित्य संमेलनाला दोन कोटी रुपये सरकारतर्फे दिले जाणारे अनुदान बंद करा.
आदिवासी बहुल भागात स्वतंत्र राज्य निर्माण करा. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना मान्यता द्या. अवकाळी पाऊस, गारपीट, आवर्षण याबाबत शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई द्या.
इत्यादी मागण्याचे ठराव मंजूर करण्यात आले. हे ठराव कल्पना गावित, सुशीला गावित, अशा गावित, शितल गावित, मयुरी गावित, ललिता गावित, मरिया गावित, सविता गावित, लिलाबाई मोरे, रंगुबाई मावची यांनी मांडले व सभागृहाने एकमताने मंजूर केले.
साक्री येथील बाल आनंदनगरीमध्ये झालेल्या अधिवेशनाला साक्री, धुळे, नवापूर, नंदुरबार, कन्नड, सटाणा इत्यादी तालुक्यातून दीड हजार महिला उपस्थित होत्या. शेवटी अध्यक्ष निलाबाई वळवी यांचे भाषण झाले व परिषद समाप्त झाली.