How much grain did you get on the ration card? Watch the record online!
रेशन कार्डवर तुम्हाला किती धान्य मिळाले? रेकाॅर्ड पहा ऑनलाईन!
रेशन कार्डवर आपल्याला दर महिन्याला किती धान्य मिळायला हवे, त्याचा दर नेमका किती असावा, याची माहिती आपण घरबसल्या जाणून घेऊ शकतो.
तुम्ही हा दर पाहून तुमच्या ओळखीच्या लोकांना मदतही करू शकता. त्यांचा वेळ वाचवू शकता आणि त्यांची फसवणूक होणार नाही, याची खबरदारीही घेऊ शकता.
रेशन कार्ड रेकॉर्ड
– रेशन कार्ड ऑनलाईन पाहण्यासाठी Google वर जाऊन mahafood.gov.in असे सर्च करा.
– त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट ओपन होईल.
– या वेबसाईटवरील उजवीकडील ऑनलाईन सेवा या पर्यायाखालील ऑनलाईन रास्तभाव दुकाने याच्यावर क्लिक करा.
– त्यानंतर AePDS-सर्व जिल्हे, हा पर्याय तिथे दिसेल. त्याच्यावर क्लिक केले की, Aadhaar enabled
– Public Distribution System म्हणजेच AePDS नावाचे एक नवीन पेज ओपन होईल. या पेजवरील रिपोर्ट या पर्यायाखालील RC Details वर क्लिक करा.
– त्यानंतर RC Details नावाने एक नवीन पेज ओपन होईल. तिथे तुम्हाला महिना, वर्ष आणि SRC म्हणजेच १२ अंकी रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे.
– त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक केले की रेशन कार्ड ओपन होईल.
यात सुरुवातीला ‘मेंबर डिटेल्स’मध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती दिलेली आहे. जिल्हा, तालुका, FPS नंबर म्हणजे Fair price shop नंबर दिलेला असतो. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रेशन कार्ड धारकांना धान्य वितरित करण्यासाठी परवाना मिळालेल्या दुकानाचा हा नंबर असतो.
पुढे तुम्हाला कोणत्या योजने अंतर्गत रेशन मिळते तिचे नाव दिलेले असते. दारिद्रय रेषेखालील, प्राधान्य गट, अंत्योगट गट असे वर्गीकरण नमूद केलेले असते. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांची नावे, त्यांचे लिंग, वय, आधार कार्डचे प्रमाणीकरण झाले की नाही, ते सांगितलेले असते.
त्यानंतर Entitlement for RC या रकान्यात हे कुटुंब रेशन कार्ड अंतर्गत किती धान्य मिळवण्यासाठी पात्र आहे, ते दिलेले असते.
Authentications for RC in Apri 2023 या रकान्यासमोर एप्रिल महिन्यात कुटुंबातल्या कोणत्या सदस्याने रेशनचे धान्य खरेदी केले, याची माहिती असते.
आता रेशन कुणी खरेदी केले ते आपण पाहिले, पण किती धान्य मिळाले ते कसे पाहायचे? तर त्याची माहिती खालच्या Transaction Details for RC या रकान्यात दिलेली असते.
धान्याचा दर कसा पाहायचा?
आता तुमचे कुटुंब ज्या प्रवर्गात मोडते किंवा तुमच्याकडे ज्या प्रकारचे रेशन कार्ड आहे, त्या अंतर्गत तुम्हाला किती रुपये दराने धान्य मिळते, ते पाहूया.
यासाठी तुम्हाला mahaepos.gov.in असे सर्च करायचे आहे. या वेबसाईटच्या होमपेजवर उजवीकडील Policy & Price या पर्यायासमोर क्लिक करायचे आहे.
त्यानंतर तुमच्याकडे कोणते रेशन कार्ड आहे, त्यानुसार तुम्हाला कोणते धान्य किती रुपये दराने मिळणार, याची सविस्तर माहिती दिलेली असते.
AAY (अंत्योदय), APL (दारिद्र्य रेषेवरील), NPH (प्राधान्यगटात नसलेली कुटुंब) PPH (प्राधान्यगटातील कुटुंब) या प्रकारानुसार धान्याचा दर इथे नमूद केलेला असतो.
– Siddharth More, Dhule
हेही वाचा