Congress jubilation in Dhule after victory in Karnataka Assembly
कर्नाटक विधानसभेतील विजयानंतर धुळ्यात काँग्रेसचा जल्लोष
धुळे : सर्वाधिक जागांवर विजय मिळत कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने पूर्ण बहुमत मिळविले आहे. कर्नाटकमधील ऐतिहासिक विजयाबद्दल धुळे शहर जिल्हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्यावतीने विजयोत्सव साजरा करण्यात आला.
आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने देशाचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकून भाजपला धोबीपछाड दिली आहे. त्याअनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर जिल्हा काँग्रेस, शिवसेना(उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीतर्फे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे यांच्या पुढाकाराने १३ मे रोजी धुळे शहरातील काँग्रेस भवनाजवळ विजय उत्सव साजरा करण्यात आला. विजय उत्सवात सहभागी झालेल्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी आणि विजयाच्या घोषणा देत काँग्रेस भवन दणाणून सोडले होते.
भाजपाची जुलमी राजवट, एकाधिकारशाही आणि भ्रष्टाचार, महागाईला देशातील जनता कंटाळली असून शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब सर्वसामान्य जनतेची पिळवणूक भाजप करीत आहे. त्यामुळे कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रातही काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास डॉ. अनिल भामरे यांनी व्यक्त केला.
यावेळी धुळे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल भामरे पंचायत समितीचे माजी सभापती भगवान गर्दे, महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते साबीर खान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजीत राजे भोसले, बाजार समितीचे संचालक साहेबराव खैरनार, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, बाजार समितीचे संचालक बाजीराव पाटील, धुळे तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके, शिवाजी अहिरे, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, राजेंद्र भदाणे, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, दीपक गवळे, ज्येष्ठ नेते पितांबर महाले, मुकुंद कुळवले, इम्तियाज पठाण, बानुबाई शिरसाठ, हरिभाऊ अजळकर, भिवसन अहिरे, हरिभाऊ चौधरी, राजेंद्र खैरनार, अफसर पठाण, नाविद शेख यांच्यासह शहरातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.