Fund of 50 lakhs for roads, sewerage in Millatnagar, MLAs started the work
मिल्लतनगरात रस्ते, गटारी साठी ५० लाखांचा निधी, आमदारांनी केला कामाचा शुभारंभ
Dhule धुळे : शहरातील प्रभाग क्रमांक १२ मध्ये बाबा बर्तनवाले यांच्या घरापासून ते शाळेपावेतो काँक्रिट रस्ता व गटार कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला.
शहरातील अल्पसंख्याक भागात रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईन यांसारख्या मुलभूत सुविधा आजही पुरेशा प्रमाणात नाहीत. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरीकांचे हाल होत होते. परंतु आमदार फारुख शाह यांनी अभ्यास करून ज्या भागात रस्ते, गटारी, पाईपलाईन नाही, अशा दुर्लक्षित वस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून कामाचा सपाटा लावलेला आहे.
मिल्लतनगर परिसरात सोयी-सुविधांच्या अभावामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत होती. त्यामुळे आमदार फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाआभियान अंतर्गत प्रभाग क्रमांक १२ मध्ये बाबा बर्तनवाले यांच्या घरापासून ते शाळेपावेतो काँक्रिट रस्ता व गटार कामासाठी ५० लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या कामाचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
यावेळी जलील अहमद, साजीद साई, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, मौलवी शकील, छोटू माच्छिवाले, शाहिद शाह, हलीम शमसुद्दिन, कलीम अन्सारी, जाकिर शाह, इब्राहीम तांबोळी, हाजी अब्दुल रऊफ अन्सारी, मुस्ताक अन्सारी, वाहिद मास्टर, अजहर सय्यद, सउद आलम आदी उपस्थित होते. रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि आमदार फारुख शाह यांचा सत्कार केला.