हिंदू-मुस्लीम करणाऱ्यांनो, एकदा हा Video पहाच…
Dhule News धुळे : शहरातील सावरकर यांच्या स्मारकासंदर्भात शिवसेनेने केलेल्या लक्षवेधी आंदोलनानंतर आमदार फारुख शाह यांनी शुक्रवारी स्मारकाची पहाणी केली आणि स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी २० लाख रुपये निधी देखील दिला. यावर शिवसेनेचे नेते महेश मिस्तरी यांनी आपल्या सडेतोड शैलीतून अंध भक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले.
शहरात सन १९८३-८४ च्या सुमारास बॅ. वि. दा. सावरकर यांचे स्मारक उभारण्यात आले. गेल्या ४० वर्षात या स्मारककाडे सावरकरांबद्दल प्रेम असणाऱ्या लोकांनी सातत्याने दुर्लक्ष केले.
दरम्यान, यावर्षी १७ मे रोजी शिवसेनाच्या वतीने आंदोलन करून सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्यात आला. सावरकरांचे स्मारक दुर्लक्षित राहणे ही बाब योग्य नाही. या दृष्टीकोनातून आमदार फारुख शाह यांनी शुक्रवारी सावरकर स्मारकाची पहाणी केली आणि शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी आमदार स्थानिक विकास निधितून २० लक्ष रुपयांचा निधी दिला.
यावेळी बोलताना उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते महेश मिस्तरी यांनी आमदारांच्या कामाचे कौतुक करताना त्यांनी केलेल्या विविध विकासकामांचा पाढाच वाचला. एमआयएम पक्षाच्या मुस्लिम आमदारांनी केलेले काम हिंदू लोकप्रतिनिधींना लाजवण्यासारखे असल्याचे सांगत त्यांनी नाव न घेता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर टिका केली. तसेच आगामी निवडणुकांमध्ये जात, धर्म, पक्ष यांना थारा न देता सर्वसामान्यांचे काम करणाऱ्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन केले. महेश मिस्तरी यांनी आपल्या सडेतोड शैलीतून अंधभक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले. आमदार फारुख शाह यांनी सावरकरांच्या स्मारकाचे सुशोभीकरणाविषयी भूमिका मांडली. तसेच सुशोभीकरणाचे लेआऊट महेश मिस्तरी यांच्या हस्ते धुळेकरांना स्वाधिन केले.
पाहणी करताना शिवसेनेचे महेश मिस्तरी, नगरसेवक नासीर पठाण, नगरसेवक सईद बेग, आमिर पठाण, डॉ. दिपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, इकबाल शाह, सउद सरदार, इब्राहीम पठाण, जमील खाटीक, आसिफ शाह मुल्ला, डॉ. पवार, परवेज शाह, हलीम शमसुद्दिन, मुद्दसर शेख, फिरोज शाह, आसिफ पोपट शाह आदी उपस्थित होते.