Greetings to Panther Manojbhai Sansare
पॅंथर मनोजभाई संसारे यांना धुळ्यात अभिवादन
Dhule News धुळे : पॅंथर मनोजभाई संसारे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीचे कधिही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. अवघा महाराष्ट्र एका लढवय्या नेत्याला मुकला आहे, अशा शब्दात धुळेकरांनी दिवंगत मनोजभाई संसारे यांना आदरांजली वाहिली.
आंबेडकरी चळवळीतील आक्रमक नेते अशी प्रतिमा असलेले स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते मनोजभाई संसारे (५५) यांचे १२ मे रोजी सायंकाळी प्रदीर्घ आजाराने मुंबई सेंट्रेल येथील बाबू जगजीवनराम रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. त्यांना अभिवादन करण्यासाठी धुळे येथे गरूड वाचनालयात शनिवारी युथ पॅंथर फाउंडेशनच्या वतीने शोकसभेचे आयोजन केले होते.
आंबेडकरी समाजाचे लढवय्या नेते म्हणून ओळख असलेले मनोजभाई संसारे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. मनोजभाई संसारे यांनी केलेले कार्य आणि नामांतराच्या लढ्यात दिलेले योगदान हे महत्वपूर्ण होते. रिपब्लिकन ऐक्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात आंबेडकरी नेत्यांनी शोक व्यक्त केला.
या शोकसभेला ज्येष्ठ नेते जिभाऊ एम. जी. धिवरे, दलितमित्र वाल्मिक दामोदर, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष शशीकांत वाघ, उप महापौर नागसेन बागुल, शिवसेनेचे नेते महेश मिस्तरी, संदेश भूमी समितीचे नेते आनंद सैंदाणे, युवानेते किरण गायकवाड, सुनील लोंढे, युथ पँथर फाऊंडेशनचे शंकर खरात, विशाल पगारे, निशांत मोरे, नागिंद मोरे, यशवंत बागुल, सिद्धार्थ वाघ, किरण इशी, सनी सोनवणे, योगेश पगारे, सचिन खरात, विनोद केदार, गौतम मोरे, आकाश बागुल, आकाश येरेकर, आबासाहेब अमृतसागर, जॉनी पवार, विवेक नेतकर, बबलू रामराजे, सागर मोहिते, बबलू लोंढे, दिनेश निकुंभे, राहुल भामरे, नितीन म्हसदे, राहुल वाघ, बबलू खरात, विनोद गरुड, संदीप वाघ, बापू अहिरे, रोहित म्हसदे, संदीप त्रिभुवन, स्वप्निल सोनवणे, राहुल पवार, छोटू बोरसे, बंटी लोंढे, योगेश खैरनार, चेतन गायकवाड आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.