Mla Faruk Shah was constantly ignored by the people’s representatives!
लोकप्रतिनिधींनी सतत दुर्लक्ष केले! आमदार फारुख शाह यांची टिका
Dhule News धुळे : आतापर्यंतच्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने दुर्लक्ष केल्याने विकासकामे झाली नाहीत, अशी टिका धुळे शहराचे आमदार फारूख शाह यांनी केली. मच्छी बाजार कसाबवाडा भागात सोमवारी रस्ते कामाचा शुभारंभ केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
धुळे शहरात अल्पसंख्यांक भागात रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईन या मुलभूत सोयी सुविधांच्या बाबतीत आजपर्यंत लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागाचा विकास थांबलेला होता. कॉलनी व वस्त्यांमध्ये रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचे हाल होत आहेत. या समस्यांचा अभ्यास करून आमदार फारुख शाह यांनी ज्या भागात रस्ते, गटारी, पाईपलाईन नाही, अशा दुर्लक्षित वस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून कामांचा सपाटा लावलेला आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या मच्छी बाजार परिसरातील नागरिकांनी मागणी केल्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करण्यासाठी एक कोटीचा निधी आ. फारुख शाह यांच्या विशेष प्रयत्नाने मंजूर करण्यात आला असून, या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे हस्ते करण्यात आला.
हा रस्ता प्रभाग क्रमांक ८ मध्ये मौलवीगंज येथे आबिद सांबरवाले यांच्या घरापासून ते मीया बिडीवाले, वसीम यांच्या घरापासून ते छोटीबाई यांचे घर, बजरंग पुल ते खानदेश बेकरीपर्यंत रस्ता करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला सलीम शाह, गुफरान पोपटवाले, जलील फरहाद अन्सारी, कय्युम अन्सारी, हाजी इरफान अन्सारी, महेमुद अन्सारी पहिलवान, मुन्ना अन्सारी, निजाम सय्यद, छोटू बशीर अहमद, डॉ. शराफत अली, अब्दुल मजीद मुकादम, मुनीर अहमद, लड्डू अन्सारी, इकबाल शहा, अनिस शाह, सउद सरकार, फैसल अन्सारी, इब्राहिम पठाण, हासिम अन्सारी, फारुख अन्सारी, गुलाम रब्बानी, मोहम्मद युसुफ, जुबेर अन्सारी, छोटू मच्छीवाले, साजीद खणसा,फहीम अन्सारी, आसिफ पोपट शाह आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन निसार अन्सारी, वसिम अक्रम, रिजवान हाजी अन्सारी, यांनी केले तर सूत्रसंचालन इलियास अन्सारी यांनी केले.