धुळ्यातील स्मशानभूमीत गॅस शवदाहिनीचे काम सुरू
Dhule News धुळे : शहरात एकवीरा देवी स्मशानभूमीनंतर आता चितोड रोड अमरधाममध्येही अत्याधुनिक गॅस शवदाहिनीचे काम सुरू झाले. आमदार फारुक शाह यांनी शनिवारी या कामाचा शुभारंभ केला.
महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधा विकास योजनेअंतर्गत शवदाहिनीसाठी आवश्यक उपकरणे तसेच शेडच्या बांधकामासाठी आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने देवपूर अमरधाम व चितोड रोड अमरधामसाठी एक कोटी २८ लक्ष रुपये मंजूर करून आणले होते. चितोड रोड अमरधाम येथील कामाचा शुभारंभ आमदार फारुक शाह यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे शहरात कोरोना काळात अनेक लोकांचे निधन झाले. त्या वेळी त्यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाम सुद्धा कमी पडत होते. तसेच कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता होती. त्या वेळी आमदारांनी मोठ्या शासनाकडून निधी आणला होता. त्याचीच परिणती म्हणून आज चितोड रोड अमरधाम येथे शवदाहिनीचे काम मार्गी लागत आहे. धुळे शहराच्या विकासासाठी आमदार फारुख शाह यांनी कोणताच भेदभाव न करता प्रत्येक समाजाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न केले आहेत. यावेळी या भागातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांचे आभार मानले व सत्कार केला.
याप्रसंगी डॉ. दीपश्री नाईक, डॉ. बापूराव पवार, दैनिक नवराज्यचे संपादक सुनील पाटील, दैनिक श्रमराज्यचे संपादक अतुल पाटील, दैनिक खानदेश मैदानचे संपादक मनोज गर्दे, कॉ. एल. आर. राव, भगवान वाघ, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार गौतम पगारे, डॉ. शकील देशमुख, प्यारेलाल पिंजारी, निजाम सय्यद, इकबाल शाह, राकेश गाळणकर, शास्त्रीनगर मधील दीपकुमार साळवे, बाजीराव खैरनार , रमेश वाघ, नेरकर सर, प्रमोद पाटकर, बाळासाहेब निकुंभ, भरत परदेशी, वसंत वाघ, राजेंद्र चितोडकर, खैरनार सर, अजहर सय्यद, सउद आलम, फैसल अन्सारी, शहजाद मन्सुरी, शाहरुख कुरेशी आदी उपस्थित होते.
यावेळी मनोज गर्दे, सुनील पाटील, भगवान वाघ यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार शाह यांच्या कामाचे कौतुक केले. राकेश गाळणकर यांनी सूत्रसंचालन केले व दीपकुमार साळवे यांनी आभार मानले.