पुरवठादाराने धान्य मोजुन द्यावे! रेशन दुकानदारांची मागणी
धुळे : शिधा पत्रिकाधारकांना वितरीत करण्यात येणाऱ्या धान्याचा पुरवठा, ज्या धान्य वाहतूक कंत्राटदाराकडून केला जातो त्याने ते धान्य स्वस्त धान्य दुकानदारांना देताना मोजून द्यावे, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष महेश घुगे यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
महेश घुगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या संघटनेच्या बैठकीत शासनाच्या सततच्या बदलत्या धोरणावर, कार्यपद्धतीवर आणि धान्य वितरणात येणाऱ्या अडचणींवर ऊहापोह करण्यात आला.
नूतन जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात सविस्तर निवेदन देऊन त्वरीत योग्य कार्यवाही करणे बद्दल विनंती केली जाईल, असे महेश घुगे यांनी बैठकीची सांगता करतांना सांगितले. बैठकिच्या सुरवातीला संघटनेच्या दिवंगत सभासदांना, त्यांच्या दिवंगत नातेवाईकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. प्रारंभी संघटनेचे सचिव संतोष जैन यांनी संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. शेवटी संघटनेचे ऊपाध्यक्ष सुभाष कोटेचा यांनी आभार व्यक्त केले.
सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष व समन्वय संटनेचे अध्यक्ष महेश घुगे यांच्या नेत्रुत्वाखाली स़घटनेचे सचिव संतोष जैन, प्रमोद चौधरी, संजय गोगीया, मनिष नेवे, अतुल चित्ते, रामदास कानकाटे, महेश कोळी आदी पदाधिकाऱ्यांनी नूतन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची सदिच्छा भेट घेतली व त्यांना शुभेच्छा दिल्या.