Manipur Violence मणिपूर हिंसाचारातील दोषींना फाशीची शिक्षा द्या!
Dhule News धुळे : मणिपूर हिंसाचारातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी धुळे जिल्हा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनने केली आहे. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन दिले. मणिपूर हिंसाचाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. धुळे जिल्हा ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉइज फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने केली.
यावेळी जिल्हाध्यक्ष रोहिदास गायकवाड, जिल्हा सचिव प्रा. मच्छिंद्र ठाकरे, ए. व्ही. पाडवी, पी. बी. पवार, पी. पी. पवार, जी. जी. गावित, व्ही. एस. वसावे, एम. टी. पवार, के. डी. साबळे, आसाराम बागुल, एम. एम. कुंवर, जे. एन. देवरे, के. बी. जगताप, डी. के. जगताप, जी. जी. जगताप, एस. एल. महाले, साहेबराव अहिरे, अरविंद गायकवाड, दिलिप कुंवर, व्ही. एम. अहिरे, एच. एस. पवार, देवा पवार, एस. जी. कोकणी, के. के. बागुल, ए. आर. मावची, सचिन वळवी, डी. जी. पवार, पी. एम. वळवी, खुशाल वसावे, सनी शेतळे, योगेश वसावे, दुर्गेश बोरसे, बबिता पटले, रवींद्र बोरसे, विश्वनाथ सोनवणे, मंगलदास वळवी, आशा चव्हाण, श्याम मालचे यांच्यासह आदिवासी कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा