आरटीओ कार्यालय इमारत बांधकामाचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ
Dhule News धुळे : आरटीओ कार्यालय इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ आमदार फारूख शाह यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. शहरालगत मालेगाव रोडवर असलेले कार्यालय भाडेतत्त्वाच्या इमारतीमध्ये आहे. आता कुंडाणे रस्त्यावर प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू आहे.
अनेक प्रशासकीय कार्यालये भाडेतत्वाच्या इमारतीमध्ये सुरू आहेत. त्यापोटी शासनाला लाखो रुपये भाडे द्यावे लागत आहे. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालय बांधकामासाठी आ. फारुख शाह यांच्या प्रयत्नामुळे शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. कुंडाणे रोड येथे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या बांधकामाचा शुभारंभ आ. फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला.
धुळे शहरातील बहुतेक सरकारी कार्यालये भाड्याच्या जागेवर असून, त्यासाठी शासनाला लाखो रुपये भाडे अदा करावे लागते. आ. फारुख शाह यांनी शहरातील नागरिकांची अडचण पाहता आदिवासी प्रकल्प कार्यालय, एमआयडीसी प्रशासकीय इमारत, एमआयडीसी अग्निशामक केंद्र, धुळे जिल्हा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राज्य उत्पादन शुल्क कार्यालय ईमारत बांधकामासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी शहरासाठी उपलब्ध करून दिला.
जिल्ह्यातील व शहरातील नागरिकांना सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध व्हावी म्हणून प्रशासकीय इमारतीचे प्रस्ताव शासनाकडे पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांमार्फत सादर करण्यात आलेला आहे. त्याचे आराखडे व अंदाजपत्रक तयार करण्याचे काम प्रगतीपथावर असून, लवकरच निविदा प्रक्रिया पार पाडून कामास प्रारंभ होणार आहे. नागरिकांच्या मुलभूत गरजांबरोबरच नागरिकांना प्रशासकीय सुविधा उपलब्ध करून देण्याची आ. फारुख शाह यांच्या दूरदृष्टीपणामुळे शहरासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होत आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी आ. फारुख शाह यांचे आभार मानले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे, कनिष्ठ अभियंता राहुल पाटील, डॉ. दीपश्री नाईक, डॉ. बसुराव पवार, निजाम सैय्यद, इकबाल शाह, आसिफ शाह मुल्ला, फिरोज शाह, आसिफ पोपट शाह, अजहर सैय्यद, अरबाज शाह, सलमान अन्सारी, छोटू शाह, अकिब अली, समीर शाह, गोलू शाह, लालाभाई अन्सारी, शकील मौलाना,कैसर अहमद,माजीद पठाण, जिड्या पहिलवान उपस्थित होते.