स्वयंभू कंपनीवर दंडात्मक कारवाईचे महापौरांचे आदेश
Dhule धुळे: कचरा संकलनातील गैरव्यवहार प्रकरणी स्वयंभू कंपनीवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश महापौर प्रतिभा चौधरी यांनी दिले आहेत. करारनाम्यातील अटी-शर्तींचा भंग केल्याचा ठपका कंपनीवर ठेवण्यात आला आहे.
महापौरांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,
1. स्वच्छ भारत अभियानमध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वाप्रमाणे शहरामध्ये कचरा संकलन करीत असतांना शुन्य कचरा करणे आवश्यक आहे. म्हणजे प्रामुख्याने कचरा कमी करणे होय, तथापी स्वयंभु कंपनीमार्फत नागरीकांना ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याबाबत कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन केलेले नाही. हि कंपनी शहरामध्ये गेल्या बऱ्याच वर्षापासून काम करीत आहे. शहरात कचरा कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे.
2. शहरात कचरा संकलन करीत असतांना सदर कंपनीस अटी व शर्तीनुसार 79 घंटागाडी देण्यात आलेला आहे. मात्र प्रत्यक्षात एकुण 79 घंटागाडी सुरु आहे का याबाबत संभ्रम निर्माण होत आहे.
3. शहरातील प्रभागामध्ये घंटागाडीमध्ये किती नागरीक ओला व सुका कचरा वर्गीकरण करून देतात तसेच कचरामध्ये माती मिश्रित कचरा किती असतो. यांचे मुल्यमापन कोणत्याही त्रयस्त यंत्रणाकडून केलेले नाही.
4. केलेल्या अटी व शर्तीनुसार प्रत्यक्षात काम सुरु केल्यानंतर सदर संस्थेच्या कामाबाबत 6 महिन्या नंतर स्थायी समितीमध्ये मूल्यमापन करणे आवश्यक होते. तथापी अद्यापपर्यंत सादर केलेले नाही.
5. याचबरोबर सदर संस्थेने आपल्या कामाबाबत MLP सादर केली नाही.
6. आजही शहरामध्ये कोणत्याही वाहनाची तपासणी केली तर प्रत्येक वाहनामध्ये कचरा कमी व माती जास्त असते. त्याचप्रमाणे एकीकडे आपण डेपोवर कचरा कमी करण्यासाठी कोटी रु. खर्च करून बायो मायनिंग करीत आहे. दुसरीकडे परत मातीचे डोंगर करीत आहे. आजही डेपोवर मातीचे डोंगर आपण ओला व सुका कचरा न करता माती घेऊन येत आहे.
7. धुळे महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये सदर स्वयंभू ट्रान्सपोर्ट, पुणे कंपनीस विनामुल्य सर्व सोयीयुक्त तक्रार निवारण कक्षसाठी देण्यात आले आहे. ते कोणत्या आधारावर देण्यात आले आहे. सदर कंपनी हि पैसे कमवीत आहे. कोणत्या प्रकारची सेवाभावी काम करीत नाही, कारण आजहि अनेक मनपच्या अनेक कार्यालय यांना बसण्यासाठी जागा नाही त्यांना कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा देण्यात आलेला नाही. जर यांना आपण कार्यायल देण्याचे असेल तर कोणत्याही एक मनुष्य बसेल अशा ठिकाणी देण्यात यावी व यांच्याकडून शासकीय दरानुसार भाडे घेण्यात यावे. या कंपनीस स्वतंत्रय कार्यालय देण्याचे आवश्यकता नाही.
8. अटी व शर्तीनुसार प्रत्येक वाहन चालकाकडे गणवेश व ओळख पत्र असणे आवश्यक आहे. परंतू वाहन चालकाकडे नाही. यासाठी संबंधित ठेकेदारवर कार्यवाही प्रशासनाने केली नाही.
9. अटी व शर्तीनुसार शहरात घंटागाडी मधील कचराखाली करण्याकामी ४ ठिकाणी ट्रांसफर स्टेशन उभारणे आवश्यक होते. मात्र अद्याप पर्यंत 2 ठिकाणी काम सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने 1.नवरंग पाण्याची टाकी 2.दसेरा मैदान या ठिकाणी सुरु आहे. दोन ठिाकणी सुरु नाही या बाबत कंपनीने खुलासा सादर केला नाही.
10. अटी व शर्तीनुसार शहरात घंटागाडीची व इतर वाहने धुण्यासाठी वाशिंग स्टेशन उभारणे आवश्यक आहे. मात्र सदर कंपनीने केलेले नाही.
11. अटी व शर्तीनुसार शहरात घंटागाडी विषयी GPS APPS नागरीकांना देण्यात आलेले नाही.
12. मनपाच्या मालकीच्या घंटागाडी या सदर कंपनीस विनामुल्य देण्यात आलेल्या त्याच्याकडुन शासकीय नियमानुसार मनपाने भाडे आकारणी करावी.
13. घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार स्वयंमभू ट्रान्सपोर्ट,पुणे आपण केलेल्या अटी व शर्तीनुसार कचऱ्याचे 100% निर्मिती ठिकाणीच कचरा विलगीकरण करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने अविघटनशील कचरा, सॅनिटरी कचरा, पुन प्रक्रियेस करण्यास अयोग्य कचरा, घरगुती घातक कचरा, बांधकाम करतांना तसेच बांधकाम पाडतांना होणारा कचरा अशा विविध प्रकारचा घनकचरा निवडून त्याची स्वतंत्रपने साठवणूक करणे आवश्यकआहे.
तसेच घरगुती कचरा, सनिटरी कचरा, व्यापारी कचरा. संस्थात्मक कचरा, अन्न पुरवठा विषयक बाजारातील कचरा रस्ता झाडल्या नंतरचा कचरा, गटारीतील काढलेला गाळ, उद्याने फळभाज्या विषयक कचरा वगळून जेव वैद्यकीय कचरा यामध्ये घरगुती घातक कचराचा समावेश होतो.
तसेच कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी अधिक चांगल्या पायाभूत सुविधाची अंशत: संस्करण केलेल्या संस्करण न केलेल्या घनकचराची अशी वाहतूक की, ठिकाणाहून दुसऱ्या पर्यावरणाच्या दृष्टीने ती काळजी घेऊन तसेच विशीष्ट पद्धतीने तयार केलेल्या बंदिस्त वाहतूक प्रणालीचा जाते. जेणेकरून वातावरण खराब होणार नाही. कचरा अस्ताव्यस्त सांडणे ओंगळवाणी परोस्थितो घनकचरा व्यवस्थापण अधिनियम 2016 नुसार हा कचरा संकलन करून डेपोवर घेऊन जाणार आहे. नुसार ओला व सुका तसेच घरघुती घातक कचरा जागेवर वर्गीकरण करणे आवश्यक आहे. त्यामध्ये यामध्ये नदी,नाले डेपोवर, प्रभागात कचरा जाळला जात आहे.
यामध्ये आपण घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 व केंद्र व राज्य प्रदुषण मंडळाच्या नियमाची सरांसपणे पायमल्ली करीत आहे.
14. स्वयंभु या संस्थेने शहरातील M.L.P. (MICRO LEVAL PLAYN) सादर करावयाचा होता तो अहवाल सादर केलेला आहे किंवा नाही या बाबत स्थायी समितीस अवगत केलेले नाही.
15. जर स्वयंभू या संस्थेने शहरातील M.L.P. (MICRO LEVAL PLAYN) सादर केला असेल तर याबाबत अटी व शर्तीनुसार काम होत आहे. यासाठी खातरजमा करण्यात आलेली आहे का?
16. जर स्वयंभू या संस्थेने शहरातील M.L.P. (MICRO LEVAL PLAYN) सादर केला नसेल तर आयुक्त यांनी स्वयंभू या संस्थेला दंड केला आहे का?