खासदार डॉ. सुभाष भामरे यांचा पत्ता कट होणार की काय?
धुळे : भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार, माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचा पत्ता कट होणार की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पक्षाचे ज्येष्ठ सदस्य प्रतापराव दिघावकर यांनी धुळे लोकसभा मतदार संघात जनसंपर्क सुरू केला आहे.
नाशिक परिक्षेत्राचे सेवानिवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर हे धुळे लोकसभा मतदार संघात येणाऱ्या बागलाणचे भूमिपुत्र आहेत. शनिवारी त्यांनी धुळे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. तसेच प्रसारमाध्यमांसमोर भूमिका विषद केली. पक्षश्रेष्ठींनी धुळे लोकसभा मतदार संघात संधी दिली तर आपण ती जबाबदारीने पार पाडू, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
ते म्हणाले की, जळगावसाठी अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या नारपार प्रकल्पासाठी आरपारच्या लढाईची आपली तयारी आहे. खान्देशच्या हक्काच्या पाण्यासाठी लढा उभारणार असल्याचे प्रतापराव दिघावकर म्हणाले. यांनी फुंकले आहेत. दिघावकर यांनी २ ऑगस्ट २०२३ रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेशानंतर धुळे लोकसभा मतदार संघातील भाजपचे इच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. पक्ष प्रवेशाच्या महिनाभरानंतर त्यांनी धुळ्यात सर्किट हाऊस येथे पत्रकार परिषद घेतली. विविध मुद्यांवर त्यांनी भाष्य केले.
पक्षाने संधी दिली तर लोकसभा निवडणूक नक्कीच लढविणार असल्याचे दिघावकर यांनी स्पष्ट केले. धुळे लोकसभा मतदार संघातील समस्यांबद्दल प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, धुळे लोकसभा मतदार संघात सिंचनाची मोठी समस्या आहे. शेतकऱ्यांचे भाग्य सिंचनामुळे उजळू शकते. पश्चिम वाहिनी नद्या, नदीजोड प्रकल्प, नार-पार प्रकल्प यातून संपूर्ण पाण्याचे ऑडिट करायचे मी ठरविले आहे. नार-पार प्रकल्पाची १९५६ पासून चर्चा आहे. या प्रकल्पातील पाणी धुळ्याला मिळाले तर शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र बदल होईल. नारपारचे पाणी बिड आणि गुजरातला दिले जात असल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर दिघावकर म्हणाले की, खान्देशच्या हक्काच्या पाण्यासाठी योग्य व्यासपीठावर लढणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
धुळे लोकसभा मतदार संघातील तरुणांच्या हाताला काम, पायाभुत सुविधा, उद्योग धंद्यांसाठी पोषक वातावरण यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे ते म्हणाले. आयजी पदावरुन निवृत्त झाल्यानंतर नव्या भुमिकेत मी आता शिरत आहे. शेतकरी ते आयजी असा माझा प्रवास असल्याने ग्रामीण अर्थकारण, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून आहे. त्याबाबतीत मी संवेदनशिल असून, शेतकऱ्यांना मदतीची भुमिका माझी कायम राहिली आहे.
हेही वाचा