मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार : MLA Farukh Shah
धुळे : मराठा आरक्षणासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde CM) यांना भेटणार असून, मराठा बांधवांवर झालेला लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवणार आहोत अशी माहिती आमदार फारुख शाह (Farukh Shah MLA) यांनी सोमवारी धुळ्यात दिली.
धुळे शहरातील इदगाह मैदानाला संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचा आमदारांच्या हस्ते सोमवारी शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना भाजपचे लोक सांगायचे की आमच्या हातात सत्ता द्या. आम्ही दोन महिन्यात मराठा समाजाला आरक्षण देऊ. (Maratha Reservation) पण आता सव्वा वर्ष झाला आहे. तरीदेखील त्यांनी मराठा बांधवांना न्याय दिलेला नाही, अशी टीका करीत आमदार फारुख शाह यांनी जालना घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला.
धुळे जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, असे आमदारांनी सांगितले.
विकासकामांच्या मुद्यावर बोलताना आमदारांनी कोणाचेही नाव न घेता भाजपच्या नेत्यांवर टीका केली. ते म्हणाले की, कोणी काहीही सांगो. त्यांना श्रेय घेण्याची सवय झाली आहे. 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आम्ही शहरातील साक्री रोडचे रुंदीकरण आणि डांबरीकरण केले. पथदिवे लावले. असे असताना माजी महापौर प्रदीप कर्पे यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. फॉरेस्ट कॉलनीच्या रस्त्याचे कामही आम्ही मंजूर करून आणले. परंतु फुकटचे श्रेय लाटण्याची त्यांना सवय झाली आहे. त्यांना कितीही श्रेय घेऊ द्या. जनतेला सर्व माहित आहे, असे आमदार म्हणाले.
इदगाह मैदानाचे सुशोभीकरण : धुळे शहरातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी आ. फारुख शाह यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. तसेच शहरातील व जिल्ह्यातील धार्मिक स्थळांच्या विकासासाठी त्यांच्या प्रयत्नांमुळे निधी मिळाला. त्याचाच एक भाग म्हणून देवपूर ईदगाह मैदानाची कुंपण भिंत, सुशोभीकरण आणि पेवर ब्लॉक बसवण्यासाठी 50 लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला. धुळे जिल्ह्यातील आर्वी सोनगीर, बाळापुर, वडणे, नकाने, मेहरगाव तसेच आई एकवीरा देवी मंदिर जलाराम बाप्पा मंदिर यासाठी आ.फारुख शाहयांनी विशेष प्रयत्न करून धार्मिक स्थळांच्या विकास केला व तिथल्या मूलभूत सुविधा पुरविण्या कामी शासनाकडून भरघोस निधी नागरिकांसाठी उपलब्ध करून दिला आहे. आजच्या परिस्थितीत धुळे शहरातील विकासांबरोबर शहराच्या सुशोभीकरण असो धार्मिक स्थळांच्या विकास असो आणि शासनाच्या विविध कार्यालयांच्या उभारणीसाठी आ.फारुख शाह यांनी शासनाकडून शेकडो कोटी रुपयांचा निधी आज शहरासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका आ.फारुख शाह यांची राहिलेली आहे व राहणार आहे त्या अंतर्गत हा देवपूर ईदगाह मैदान येथे कुंपण भिंत आणि पेविंग ब्लॉक बसवणे कामाच्या शुभारंभ आ. फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सलीम शाह, नगरसेवक गनी डॉलर, अरिफ पठाण, डॉ. बापूराव पवार, कैसर अहमद, मौलाना शकील मोहम्मद शाह, मुक्तार अली, मोहम्मद शेख, छोटू मच्छीवाले, आफताब मिर्झा, मसूद्दीन काझी, जमील पेंटर, नुरा ठेकेदार, जुबेर मिर्झा, आवेश शाह, वसीम शेख, तबरेज शाह, वसीम शेख, सय्यद अल्ताफ अली, समीर शहा, सलमान अंसारी ,असद शाह, जुबेर शेख, आकीब अली, अझहर सय्यद, आसिफ शाह, शहजाद मांसुरी, शकील शेख, फैसल अन्सारी आदी उपस्थित होते.
हेही वाचा