जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी झाले शिक्षक, गोविंदा बनून दहीहंडीही फोडली
धुळे : तालुक्यातील फागणे केंद्र शाळेंतर्गत येणाऱ्या काळखेडे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडून शालेय कामकाज सांभाळले. विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा तसेच इतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
काळखेडे जिल्हा परिषद शाळेत दहीहंडी उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुला-मुलींनी पारंपरिक वेशभूषा करून दहीहंडी फोडली. शाळेतील विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विलास केदार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपशिक्षक संजिव पाटील, प्रविण साळुंके, प्रविण बोराडे, पल्लवी मांडोळे यांच्यासह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.