धुळ्याच्या गणेशोत्सवात’लव जिहाद’ विषयावर आरास
धुळे : येथील लालबागचा राजा गणेश मंडळातर्फे ‘लव जिहाद’ रोखण्यासाठी ‘जागर स्त्री शक्तीचा’ हा सजीव देखावा साकारण्यात आलाय. या देखाव्याला महिला आणि मुलींकडून दाद मिळत आहे. अभिनय करणारे कलावंत धुळे, नाशिक, पुणे आणि मुंबई येथून आले आहेत.
नवसाला पावणारा लालबागचा राजाची महाआरती मातृशक्तीच्या हस्ते गुरुवारी करण्यात आली. तसेच ‘जागर स्त्री शक्तीचा’ या आरासचे उद्घाटनही धुळ्यातील मान्यवर महिला शक्तीच्या हस्ते पार पडले.
धुळे शहरातील गल्ली क्रमांक दोनमधील लालबाग मारुती मित्र मंडळातील लालबागचा राजाचे दरवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. लालबागचा राजाची ही मूर्ती मूर्तिकार संतोष कांबळी यांच्या हस्ते तयार करण्यात आली आहे. गुरुवारी या गणरायाची मातृशक्तीच्या हस्ते महाआरती करण्यात आली. मंडळाच्या वतीने जागर स्त्री शक्तीचा या सजीव देखाव्याची निर्मिती करण्यात आली आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे यंदाचे ३५० वे वर्ष असल्याने मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण म्हणजे ‘महिलांचा सन्मान’ याला महत्त्व दिलय. यात ‘लव जिहाद’ हा प्रमुख विषय घेण्यात आला. यामागील मंडळांचा उद्देश समाज प्रबोधन करणे हा आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी नारी शक्तीबंधन विधेयक आणि ३३ टक्के आरक्षण लोकसभेत तसेच राज्यसभेत मंजूर केल्याबद्दल आनंदोत्सव देखील साजरा करण्यात आला. यावेळी ‘धन्यवाद मोदीजी’ म्हणत आकाशात फुगे सोडण्यात आले आणि पेढे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी केले. यावेळी महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील, सभागृह नेत्या भारती माळी, गटनेत्या वालीबेन मंडोरे, मनपा विरोधी गटनेत्या कल्पना महाले, महिला बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे, उपमहापौर वैशाली वराडे, बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका अल्पा अग्रवाल, जिल्हाध्यक्षा वैशाली शिरसाठ, ग्रामीण महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा धरती देवरे, सुलोचना चौधरी, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. प्रियंका पाटील, निशा चौबे, कीर्ती वराडे, रंजना पाटील, नगरसेविका वंदना थोरात, सुरेखा देवरे, निशा पाटील, वंदना भामरे, स्नेहल जाधव, माजी नगरसेविका सुनिता कर्पे, यमुना जाधव, कमल गुरव, आरती महाले, सुनिता सोनार, संगीता राजपूत, ललिता थोरात, मोहिनी धात्रक, सुवर्णा बडगुजर, सुनंदा जोशी, अनुघा देशपांडे, अश्विनी सोनार, निकम इन्स्टिट्यूटच्या शुभांगी निकम, वैजयंती अमृतकर, मीनाक्षी सोनार, विमल वाघ, कलावती पाटील, सुलोचना अग्रवाल, आशा भटेबरा, कविता सोनार, मनीषा मोरे, डॉ. रूपाली पाटील, डॉ. प्रिया म्हस्के, डॉ. गीतांजली सोनवणे, ॲड. रोहिणी महाजन, अनिता विसपुते, गीतांजली कोळी, मीनल अग्रवाल, रूपाली महाले, संध्या महाले, रंजना जावरे, विजया चौधरी, मालती आहिरराव, संगीता संन्यासी, भारती अहिरराव, स्वाती अहिरराव, रोहिणी ठाकूर आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सर्व माता-भगिनींचे लालबाग मित्र मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. तसेच प्रसादासह मानाच्या लालबागच्या राजाची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
हेही वाचा
मुस्लिम बांधवांच्या ढोल ताशाच्या गजरात गणरायाचे स्वागत
महत्वाची क्षणचित्रे…