सातारा दंगलीच्या निषेधार्थ एमआयएमचे आंदोलन
धुळे : मौजे पुरोसावली (ता .खटाव जि. सातारा) येथे १० ऑक्टोबर रोजी झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ धुळ्यात मंगळवारी एमआयएम पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. दोषींवर कारवाईची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील मौजे पुरोसावली गावात रात्री अचानक मुस्लिम समाजावर हल्ला झाला. त्यात एक मुस्लिम युवक ठार झाला तर 13 जण जखमी झाले. मशिदीचा अवमान व नुकसान करण्यात आले. दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. प्रमुख मागण्या अशा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर एफआयआर नोंद करून कार्यवाही करण्यात यावी. सातारा येथील डीएसपींना व सबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल तसेच जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल कार्यवाही करण्यात यावी. मृत्यू पावलेले नुरुल हसन यांच्या कुटुंबाला एक कोटी रुपये शासनाकडून मोबदला तसेच त्यांच्या तसेच त्यांच्या विधवा बायकोला शासकीय सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे. मशिदीसह नुकसानग्रस्तांना नुकसानीची शासनाकडून भरपाई करून देण्यात यावी. जखमी झालेल्या प्रत्येक व्यक्तीस एक लाख रुपये मोबदला देण्यात यावा.
यावेळी नगरसेवक सईद बेग, नगरसेवक मुक्तार बिल्डर, नगरसेवक आमिर पठाण, माजी नगरसेवक साजिद साई, इलियास सर, प्यारेलाल पिंजारी इकबाल शाह, शोएब मुल्ला, कैसर अहमद, एजाज सय्यद, हलीम शमशुद्दीन, सउद सरदार, आसिफ शाह, फातेमा अन्सारी, शकिला शेख, अकीला मणियार, महेमुना अन्सारी,नजर पठाण, सलमान खान, समीर मिर्झा, फैसल अन्सारी, सउद आलम, शाहरुख शाह, आदी उपस्थित होते.