अमिनाबाद भागात काँक्रिट रस्ता कामाचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ
धुळे : महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 नॅशनल हायवे पासून ते मिसबा मशिद जुना वडजाई रोडपर्यंत एक कोटी रुपयाच्या काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन आ. फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले.
धुळे शहरातील रस्त्यांसाठी व मूलभूत सुविधांसाठी आ. फारुख शाह यांच्या प्रयत्नातून सुमारे चार वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा निधी शहराच्या विकासासाठी येत आहे. पूर्वी शहरात रस्ते व मूलभूत सुविधांच्या विकासासाठी निधी येत नसल्याने शहराची अवस्था खड्डेपूरसारखी झाली होती. आ. फारुख शाह यांनी धुळे शहराचा संपूर्ण अभ्यास केला व शहरातील विविध भागातील नागरिकांनी रस्ते व गटारी संदर्भात व मूलभूत सुविधांसंदर्भात जे निवेदने दिली त्याला तात्काळ प्रतिसाद देत शासनाकडे निधीची मागणी केली. पाठपुरावा करून चार वर्षापासून शहराच्या विविध भागात लोकांना मूलभूत सुविधा कसे पुरवता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित केले. आज शहरातील 80 टक्के रस्त्यांचे काम आमदार फारुक शाह यांच्या प्रयत्नाने झालेले आहे.
दरम्यान, महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सुविधा विकास योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 नॅशनल हायवे ते मिसबा मशिद व निजबा मशिद ते जुना वडजाई रोडपर्यंतच्या रस्त्या संदर्भात त्या नागरिकांचे निवेदन आले होते. या भागात पावसाळ्यात चालणे सुद्धा दुरापास्त होते. त्या रस्त्याला आमदार फारुक शाह यांच्या प्रयत्नाने एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. या कामाचा शुभारंभ आ. फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी हाफिज वसिम, सलीम शाह, नगरसेवक गणी डॉलर, नगरसेवक आमिर पठाण, प्यारेलाल पिंजारी, निजाम सय्यद, मौलाना शकील, कैसर अहमद, जावेद मिर्झा, सुफी हाजी, हलीम शमसुद्दिन, आसिफ शाह, अनिस शाह, पप्पू शेख, सलमान खान, जावेद पठाण, बिलाल शेख, फिरोज शेख, सउद आलम, आसिफ अन्सारी, इब्राहिम प्लंबर, आरिफ सैय्यद, रज्जाक पठाण, फाहद मिर्झा, नजर पठाण, वसिम पिंजारी, सद्दाम शाह, रियाज शाह, समीर शाह, मोईन खान, माजीद पठाण, जिड्डया पहेलवान आदी उपस्थित होते.