• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home जगावेगळं

Keki Moose: A Unique Story केकी मूसः एक अनोखी कहानी

जगप्रसिध्द कलाकाराची जगावेगळी गोष्ट

no1maharashtra by no1maharashtra
19/06/2023
in जगावेगळं, जळगाव, विशेष लेख
0
Keki Moose: A Unique Story केकी मूसः एक अनोखी कहानी
Keki Moose: A Unique Story केकी मूसः एक अनोखी कहानी
0
SHARES
49
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
Keki Moose: A Unique Story

केकी मूसः एक अनोखी कहानी

# chalisgaon: आपण जेंव्हा फेमस लव्हस्टोरीज बद्दल बोलतो तेंव्हा आपसूकपणे रोमिओ-ज्युलिएट, हिर-रांझा, बाजीराव-मस्तानी, सलीम-अनारकली, सम्राट पृथ्वीराज चौहान-संयोगिता यांची नावे तोंडावर येतात व जेंव्हा जागतिक पातळीवरील आर्स्टिस्टबद्दल बोलतो तेंव्हा पिकासो, लिओनार्डो द विंची, क्‍लाऊड मोनेट, एम.एफ.हुसेन या नावांशिवाय ती चर्चा पूर्ण होत नाही. मात्र तुम्हाला जर कुणी सांगितले. या सर्वांपेक्षा एक मोठा आर्स्टिस्ट होता व त्याची प्रचंड हटके अशी लव्ह स्टोरी होती आणि हा व्यक्ती कुणी विदेशी नव्हे तर भारतीय होता व तो जळगाव जिल्ह्यात राहत होता, तर तुमचा विश्‍वास बसेल का? होय, तुम्ही जे वाचलं ते अगदी खरं आहे. चाळीसगाव येथे राहून देश-परदेशांतल्या जवळजवळ ३०० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या केकी मूस यांच्या बद्दल आपण बोलतोयं. याचं निमित्त म्हणजे आज ३१ डिसेंबरला केकी मूस यांची पुण्यतिथी आहे.
या कलाकाराचं पूर्ण नाव कैकुश्रु माणिकजी मूस. त्यांची आई मात्र त्यांना लाडाने ‘केकी’ म्हणायची. नंतर हाच अवलिया कलाकार केकी जगासाठी कलामहर्षी केकी मूस झाला. चाळीसगाव स्टेशनच्या धुळे प्लॅटफॉर्मच्या बाजूलाच एक दगडी बंगला दिसतो. त्याचं नाव ‘रेब्रा स्ट्रीट’. ते केकींचं कलादालन. केकी यांचा मुंबईतल्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत १९१२ मध्ये एका पारशी कुटूंबात जन्म झाला. त्यांचे मामा स्वातंत्र्यपूर्व काळातील नामवंत बिल्डर होते. त्यांचे नाव आर.सी.नरिमन. तत्कालिन व्ही.टी स्टेशन अर्थात आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही त्यांनी बांधलेली वास्तू आहे. आपणा सर्वांना मुंबईचे नरिमन पॉईंट माहित आहेच. हे नाव त्यांचेच आहे. मुबंईच्या विल्सन महाविद्यालयात पदवीपर्यंत केकी यांचे शिक्षण झाले पुढील उच्च शिक्षण ते इंग्लंडला रवाना झाले. केकींनी १९३५ मध्ये लंडनमधील ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला. ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’ने फोटोग्राफीच्या जागतिक दर्जाच्या ज्या स्पर्धा त्या चार वर्षांत घेतल्या त्या स्पर्धांमध्ये केकींनी प्रथम येण्याचा बहुमान दोनदा मिळवला, अन् ते लंडनमध्ये असतानाच जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून नावारूपाला आले. केकींनी १९३८-१९३९ या वर्षभरात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान, ब्रिटन, इटली इत्यादी राष्ट्रांचा दौरा केला. त्यानंतर केकी १९३९ च्या डिसेंबर महिन्यात भारतात परत आले. दिल्लीवरून मुंबई आणि मुंबईवरून सरळ चाळीसगावी त्यांच्या बंगल्यात आले आणि त्यानंतर तब्बल पन्नास वर्षें, त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला आत्मकैद करुन घेत अखंड कलासाधना केली.
४८ वर्ष पाहिली प्रेयसीची वाट
सलग ४८ वर्ष या घरात राहून केकी त्यांच्या प्रेयसीची वाट पाहत होते असंही म्हटलं जातं. रोज रात्री एक वाजता मुंबईहून पंजाब मेल चाळीसगाव स्टेशनला पोहोचते. त्या मेलच्या वेळी ते बंगल्याच्या गेटवर येऊन थांबायचे. ती त्या मेलने येणार होती म्हणे. त्यांना ती खरोखरच येईल अशी आशा होती. ती कोण होती? ती खरंच येणार होती का? या आणि अशा कितीतरी गोष्टी अनुत्तरित राहतात. मात्र केकी यांची ही लव्हस्टोरी आता जगप्रसिध्द झाली आहे. ते ज्या घरात राहिले तिथेच त्यांनी ३१ डिसेंबर १९८९ ला अखेरचा श्वास घेतला. याच घरात राहून त्यांनी देश-परदेशांतल्या पुरस्कारांवर आपलं नावही कोरलं. ते जवळजवळ ३०० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी होते.
चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’
या कलाकाराने निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’! त्यांच्या स्टुडिओला भेट देणार्‍या जवळपास प्रत्येक मान्यवराचे त्यांनी एक आगळे वेगळे छायाचित्र काढलेले आहे. पंडित नेहरू, जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, साने गुरुजी, पंडित महादेवशास्त्री जोशी, महर्षी धोंडो केशव कर्वे, ना. ह. आपटे, ना. सी. फडके, श्री. म. माटे, आचार्य अत्रे, वसंत देसाई, बाबा आमटे अशी कितीतरी नावे घेता येतील. या सगळ्या छायाचित्रांमध्ये लक्ष वेधून घेणारे एक छायाचित्र एका वृध्द फासेपारधी महिलेचे आहे. या वृद्ध महिलेच्या चेहर्‍यात त्यांना सार्‍या जगाचे दु:ख जसे दिसले. या वृद्धेच्या काढलेल्या छायाचित्रांना पुढे जगभर प्रसिद्धी मिळाली.
टेबलटॉप फोटोग्राफीचे जनक
चित्रकाराचा पिंड असणारे केकी मूस नंतर जगप्रसिध्द छायाचित्रकार झाले. चित्रकाराचा छायाचित्रकार होण्यासाठी कारण ठरलं दुसरं महायुध्द! कारण केकी ज्या कागदारवर ऑइल पेेंटिंग करायचे तो कागद दुसर्‍या महायुद्धादरम्यान भारतात येणं बंद झालं. त्यानंतर केकी यांनी अनेक प्रयोग केले. मात्र ते त्यांच्या मनासारखं होत नसल्याने ते फोटोग्राफीकडे वळाले. त्यांच्या फोटोग्राफीचे वैशिष्ठ म्हणजे, टेबलटॉप फोटोग्राफी…जे स्पेशल इफेक्ट्स आताचे फोटोग्राफर नवतंत्रज्ञानाचा वापर करुन जगासमोर सादर करतात. त्यापेक्षा कितीतरी सरस फोटोग्राफी केकी यांनी टेबलटॉप फोटोग्राफीच्या माध्यमातून समोर आणली. टेबलटॉप फोटोग्राफी म्हणजे, वस्तूंची कल्पक मांडणी करुन त्यांचा योग्य उंचीवरून काढलेला, सावल्यांवर विशेष भर असणार्‍या छायाचित्राला टेबलटॉप फोटो म्हणतात. टेबलटॉप फोटोग्राफीच्या माध्यमातून काढलेले छायाचित्र जिवंत असल्याचा भास होतो. या टेबलटॉप फोटोग्राफीसाठी लागणार्‍या चीजवस्तू त्यांनी घरातच जमवल्या होत्या. त्यांनी टेबलटॉपसाठी वापरलेल्या सगळ्या चीजवस्तू अजूनही चाळीसगावच्या केकी मूस कलादालनात आहेत. जवळजवळ त्यांच्या १५०० कलाकृतींची कल्पक मांडणी या कलादालनात केलेली आहे.

– सुनील बैसाणे, धुळे

मोबा. 9764031298
No.1 Maharashtra News Portal
Tags: chalisgaonchalisgaon newskeki mooskiki moos art gallary
ADVERTISEMENT
Previous Post

अनाथ बालकांना मिळणार आधार

Next Post

आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना, वंचित बहुजन आघाडीचे सत्ताधार्‍यांपुढे आव्हान

no1maharashtra

no1maharashtra

Next Post

आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना, वंचित बहुजन आघाडीचे सत्ताधार्‍यांपुढे आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us