• About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
NO 1 Maharashtra
Advertisement
ADVERTISEMENT
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • राजकारण
  • जगावेगळं
  • चंदेरी दुनियाँ
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • विशेष लेख
  • जिल्हा निवडा
    • धुळे
    • नंदुरबार
    • जळगाव
    • नाशिक
    • अहमदनगर
  • जाहिराती
    • Diwali Ads 2023
  • वर्धापन दिन
No Result
View All Result
NO 1 Maharashtra
No Result
View All Result
  • मुख्यपृष्ठ
  • योजना
  • क्राईम
  • राज्य
  • राजकारण
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • कृषी
  • पर्यटन
  • क्रीडा
  • राष्ट्रीय
  • आरोग्य
  • विशेष लेख
  • जाहिराती
  • वर्धापन दिन
Home राज्य

Dhammachakra Pravartan Din 2023 धम्मदीक्षा घेण्यासाठी बाबासाहेबांनी नागपूरच का निवडले?

no1maharashtra by no1maharashtra
14/10/2023
in राज्य, विशेष लेख
0
Dhammachakra Pravartan Din 2023 धम्मदीक्षा घेण्यासाठी बाबासाहेबांनी नागपूरच का निवडले?

So Babasaheb left Hinduism and accepted Buddhism?

0
SHARES
174
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

६७ वा ‘धम्मचक्र परिवर्तन दिना’च्या निमित्तानं दीक्षाभूमीवर सकाळपासून लाखो भीम अनुयायांनी गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. ‘धम्मचक्र प्रवर्तन दिना’च्या निमित्तानं दीक्षाभूमीवर सकाळी सामूहिक बुद्ध वंदना करण्यात आली. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञांचं वाचन करण्यात आलं.

म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारला?

देशातील दलितांना हजारो वर्षांच्या गुलामीतून मुक्त करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. त्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन हे एका क्रांतीचे प्रतीक आहे. या क्रांतीने आपण गुलामीतून मुक्त झालो. पण, बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे क्रांती आणि प्रतिक्रांती सोबत चालत असते. ही काही पहिली क्रांती नाही. याआधी झालेल्या क्रांतींचे काय झाले, हे बघितले पाहिजे. ही क्रांती, अर्थात स्वातंत्र्य टिकवायचे असेल, तर जागरूक राहणे आणि क्रांतीची मूल्ये समाजात रुजवणे आवश्यक आहे. अन्यथा क्रांती संपवायला प्रतिक्रांतीला वेळ लागत नाही.

म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारला?

धम्मचक्र प्रवर्तन दिन हा भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख बौद्ध सण आहे. बौद्ध धर्मीयांद्वारे हा उत्सव दरवर्षी अशोक विजयादशमी किंवा १४ ऑक्टोबर रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे तसेच स्थानिक बौद्ध स्थळांवर साजरा केला जातो. महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागातील लक्षावधी बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तनदिनी नागपूरला येतात. ह्या उत्सवाची पार्श्वभूमी एक बौद्ध धर्मांतरण सोहळा आहे. अशोक विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धम्मात प्रवेश केला आहे. भारतभूमीत जवळपास लुप्त झालेल्या बौद्ध धम्माचे चक्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गतिमान करत “धम्मचक्र प्रवर्तन” केले; तेव्हापासून हा दिवस “धम्मचक्र प्रवर्तन दिन” म्हणून साजरा केला जातो.

इ. स. पू. तिसऱ्या शतकात ज्या दिवशी सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती, तो दिवस बौद्ध इतिहासात “अशोक विजयादशमी” म्हणून साजरा केला जातो. सम्राट अशोकाने केलेली ही मोठी धम्मक्रांती होती आणि त्यामुळे आंबेडकरांनी अशोक विजयादशमीच्या दिवशी धर्मांतर सोहळा करण्याचे ठरवले व १४ ऑक्टोबर इ. स. १९५६ रोजी नागपूरमध्ये आपल्या ५, ००, ००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला. ती धम्मभूमी सध्या दीक्षाभूमी नावाने ओळखली जाते. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारून भारतातून लुप्त झालेल्या बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले.

दीक्षाभूमी, नागपूर
दीक्षाभूमी हे भारतीय बौद्धांचे विशेषतः आंबेडकरवादी बौद्ध धर्मीयांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. हे स्थळ महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात आहे. या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर इ.स. १९५६ रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्या अनुयायांनाही नवयान बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. त्यामुळे या भूमीला ‘दीक्षाभूमी’ म्हटले गेले. काही कालावधीनंतर येथे एक भव्य स्तूप उभारला गेला. दीक्षाभूमीच्या या भव्य बौद्ध स्तूपाप्रमाणे आकारामुळे याला ‘धम्मचक्र स्तूप’ असेही म्हटले जाते.
रचना : दीक्षाभूमी हा एक मोठा स्तूप आहे. दीक्षाभूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पहायला मिळतो. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहेत. दीक्षाभूमीच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाईटचा वापर केलेला आहे. दीक्षाभूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे.

धम्मदीक्षा घेण्यासाठी बाबासाहेबांनी नागपूरच का निवडले?

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बौद्ध धम्म स्वीकारला. बाबासाहेबांसोबतच त्यांच्या लाखो अनुयायांनीही बौद्ध धम्म स्वीकारला. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुख्यालय असल्याने बाबासाहेबांच्या नागपूर शहराच्या निवडीवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या पार्श्वभूमीवर नागपूर निवडले, असा कयास बांधला जात होता. त्या संदर्भात बाबासाहेबांना विचारले असता त्यांनीच शहराच्या निवडीचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले होते.

धम्मदीक्षा घेण्यासाठी बाबासाहेबांनी नागपूर निवडले

१५ ऑक्टोबर १९५६ रोजी केलेल्या ऐतिहासिक भाषणात बाबासाहेबांनी स्पष्ट केले, “अनेक लोक मला विचारतात, या कामासाठी नागपूर का ठरवले?, धर्मांतर इतर शहरात का झाले नाही?, काही लोक म्हणतात आरएसएसची बटालियन इथे नागपुरात होती, म्हणूनच आम्ही आमची बैठक या शहरात नेली. परंतु हे पूर्णपणे असत्य आहे. या कारणामुळे हा कार्यक्रम आम्ही नागपुरात आणला नाही. आमचे कार्य इतके महान आहे की, आयुष्यातील एक मिनिटही वाया घालवता येत नाही. नाक खाजवून इतरांसाठी अपशकुन करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आम्ही नागपूरची निवड केली कारण “नाग” लोक बौद्ध धर्माचा विस्तार करण्यात आघाडीवर होते. त्यांनी आर्यांशी युद्ध केले. “हे शहर निवडण्याचे कारण वेगळे आहे. बौद्ध इतिहास वाचणाऱ्यांना हे कळेल, भारतात बौद्ध धर्माचा प्रसार जर कोणी केला असेल तर ते नाग लोक होते. नाग लोक आर्यांचे शत्रू होते. आर्य आणि गैर-आर्य यांच्यात एक भयंकर आणि लढाऊ युद्ध झाले होते,” असे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे स्पष्ट करतात: “आर्य लोकांकडून नागांच्या छळाची उदाहरणे पुराणात आढळतात. अगस्ती मुनींनी केवळ एका नाग माणसाला त्यातून सुटण्यास मदत केली. आपली उत्पत्ती त्या माणसापासून झाली आहे. ज्या नाग लोकांना खूप त्रास सहन करावा लागला, त्यांना कोणीतरी महापुरुष हवा होता. त्यांची भेट गौतम बुद्ध या महापुरुषाशी झाली. नाग लोकांनी भगवान बुद्धाची शिकवण भारतभर पसरवली. त्यामुळे आपण नाग लोकांसारखे आहोत. असे दिसते की, नाग लोक प्रामुख्याने नागपूर आणि आसपासच्या प्रदेशात राहत होते. म्हणून या शहराला नागपूर म्हणतात, म्हणजे नागांचे शहर. येथून सुमारे २७ मैलांवर नाग नदी वाहते. अर्थातच नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून आले आहे.

“नाग वस्तीच्या मध्यभागी नाग नदी वाहते. हे ठिकाण निवडण्यामागचे हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे नागपूरची निवड करण्यात आली. या प्रकरणात, एखाद्याला भडकवण्यासाठी खोटे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा काही मानसिक खेळ नाही. आरएसएसचे कारण माझ्या मनातही आले नाही, त्यामुळे अफवा कोणीही खऱ्या मानू नये.”
आरएसएसला घेरण्यासाठी नागपूरची निवड केल्याचा ठपका ठेवणाऱ्या तत्कालीन विरोधी नेत्यांवरही बाबासाहेबांनी हल्लाबोल केला. आंबेडकरांच्या धर्मांतराच्या निर्णयाला विरोध करणारे टीकाकारही होते आणि त्यांनी गरीब, अस्पृश्य लोकांना “भ्रष्ट” केल्याबद्दल त्यांना दोषही दिला. बाबासाहेबांनी अशा दाव्यांना “निरुपयोगी रडे ” असे संबोधले.

१४ ऑक्टोबर १९५६ : नागपूर येथे धम्मदीक्षा घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर

भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात बौद्ध धम्म स्वीकारला. बाबासाहेबांसोबतच त्यांच्या लाखो अनुयायांनीही बौद्ध धम्म स्वीकारला. नागपूर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) मुख्यालय असल्याने आंबेडकरांच्या नागपूर शहराच्या निवडीवर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माच्या पार्श्वभूमीवर नागपूर निवडले, असा कयास बांधला जात होता. त्या संदर्भात बाबासाहेबांना विचारले असता त्यांनीच शहराच्या निवडीचा रा.स्व.संघाशी (आरएसएस) काहीही संबंध नाही, असे स्पष्ट केले होते.

१५ ऑक्टोबर १९५६ रोजी केलेल्या ऐतिहासिक भाषणात बाबासाहेबांनी स्पष्ट केले, “अनेक लोक मला विचारतात, या कामासाठी नागपूर का ठरवले?, धर्मांतर इतर शहरात का झाले नाही?, काही लोक म्हणतात आरएसएसची बटालियन इथे नागपुरात होती, म्हणूनच आम्ही आमची बैठक या शहरात नेली. परंतु हे पूर्णपणे असत्य आहे. या कारणामुळे हा कार्यक्रम आम्ही नागपुरात आणला नाही. आमचे कार्य इतके महान आहे की, आयुष्यातील एक मिनिटही वाया घालवता येत नाही. नाक खाजवून इतरांसाठी अपशकुन करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही!”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, आम्ही नागपूरची निवड केली कारण “नाग” लोक बौद्ध धर्माचा विस्तार करण्यात आघाडीवर होते. त्यांनी आर्यांशी युद्ध केले. “हे शहर निवडण्याचे कारण वेगळे आहे. बौद्ध इतिहास वाचणाऱ्यांना हे कळेल, भारतात बौद्ध धर्माचा प्रसार जर कोणी केला असेल तर ते नाग लोक होते. नाग लोक आर्यांचे शत्रू होते. आर्य आणि गैर-आर्य यांच्यात एक भयंकर आणि लढाऊ युद्ध झाले होते,” असे ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुढे स्पष्ट करतात: “आर्य लोकांकडून नागांच्या छळाची उदाहरणे पुराणात आढळतात. अगस्ती मुनींनी केवळ एका नाग माणसाला त्यातून सुटण्यास मदत केली. आपली उत्पत्ती त्या माणसापासून झाली आहे. ज्या नाग लोकांना खूप त्रास सहन करावा लागला, त्यांना कोणीतरी महापुरुष हवा होता. त्यांची भेट गौतम बुद्ध या महापुरुषाशी झाली. नाग लोकांनी भगवान बुद्धाची शिकवण भारतभर पसरवली. त्यामुळे आपण नाग लोकांसारखे आहोत. असे दिसते की, नाग लोक प्रामुख्याने नागपूर आणि आसपासच्या प्रदेशात राहत होते. म्हणून या शहराला नागपूर म्हणतात, म्हणजे नागांचे शहर. येथून सुमारे २७ मैलांवर नाग नदी वाहते. अर्थातच नदीचे नाव येथे राहणाऱ्या लोकांवरून आले आहे.

१४ ऑक्टोबर १९५६ : नागपूर येथे धम्मदीक्षा घेताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माईसाहेब आंबेडकर

“नाग वस्तीच्या मध्यभागी नाग नदी वाहते. हे ठिकाण निवडण्यामागचे हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे नागपूरची निवड करण्यात आली. या प्रकरणात, एखाद्याला भडकवण्यासाठी खोटे बोलण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा काही मानसिक खेळ नाही. आरएसएसचे कारण माझ्या मनातही आले नाही, त्यामुळे अफवा कोणीही खऱ्या मानू नये.”
आरएसएसला घेरण्यासाठी नागपूरची निवड केल्याचा ठपका ठेवणाऱ्या तत्कालीन विरोधी नेत्यांवरही बाबासाहेबांनी हल्लाबोल केला. आंबेडकरांच्या धर्मांतराच्या निर्णयाला विरोध करणारे टीकाकारही होते आणि त्यांनी गरीब, अस्पृश्य लोकांना “भ्रष्ट” केल्याबद्दल त्यांना दोषही दिला. बाबासाहेबांनी अशा दाव्यांना “निरुपयोगी रडे ” असे संबोधले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “कदाचित इतर कारणांसाठी (या निवडीला) विरोध होऊ शकतो. मी ही जागा केवळ विरोधातून निवडलेली नाही, मी तुम्हाला सांगतो. मी सुरू केलेल्या या कामावर विविध लोक आणि वृत्तपत्रांनी टीका केली होती. काही लोकांच्या टीका पराकोटीच्या असतात. त्यांच्या मते, मी माझ्या गरीब अस्पृश्य लोकांना भरकटवत होतो. ते म्हणतात, ‘आज जे अस्पृश्य आहेत ते अस्पृश्यच राहतील आणि अस्पृश्यांना मिळालेले ते अधिकार नष्ट होतील’ त्यामुळे आपल्यातील काही लोक गोंधळून गेले आहेत. आपल्यातील अशिक्षित लोकांना ते म्हणतात, “पारंपारिक मार्गाने जा” [पगदंडी (हिंदी), “पायपाथ,” महारांनी निकृष्ट मार्गाचा वापर करावा असे ते सुचवितात]. आपल्यातील काही वृद्ध आणि तरुण प्रभावित असू शकतात. यामुळे लोकांच्या मनात शंका निर्माण झाली असेल, तर ती शंका दूर करणे आपले कर्तव्य आहे; आणि ही शंका दूर करणे म्हणजे आपल्या चळवळीचा पाया मजबूत करणे होय.”

ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्यामुळे धम्मचक्र प्रवर्तन दिन दीक्षाभूमी नागपूर येथे व्यापक प्रमाणात साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध अनुयायी सहभागी होतात. तसेच राज्यातील व देशातील विविध राजकीय सुद्धा या सोहळ्याला येत असतात. विदेशांतील बौद्ध भिक्खू, उपासक व अन्य राजकीय व्यक्ती सुद्धा उत्सवात सहभागी होतात. २ ऑक्टोबर २००६ रोजी धम्मदीक्षेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला देश-विदेशांतील १० लाखांपेक्षा अधिक अनुयायांची उपस्थिती होती. सन १९५७ पासून धम्मचक्र प्रवर्तनाच्या प्रत्येक वर्धापन दिनाला दोन दिवस आधीच बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीला येत असतात. तथापि, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्याची केंद्र निर्माण झालेली आहेत. दीक्षाभूमीत आलेले आंबेडकर अनुयायी नागपूर जिल्ह्यात बुद्धिस्ट सर्किटला सुद्धा भेटी देतात, ज्यात कामठीचे ड्रॅगन पॅलेस, बुद्धभूमी, नागलोक, चिचोलीचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती साहित्य संग्रहालय आदी विविध ठिकाणे समाविष्ट होतात. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दीक्षाभूमीवर दरवर्षी हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध बनतात.

No.1 Maharashtra Online Team नंबर वन महाराष्ट्र ऑनलाईन

दीक्षाभूमी, चंद्रपूर
चंद्रपूर येथील दीक्षाभूमी हे सुद्धा एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले ठिकाण आहे. नागपूर येथे धर्मांतर केल्यावर १६ ऑक्टोबर १९५६ रोजी त्यांनी चंद्रपूर येथेही धर्मांतर सोहळा घडवून आणला, ज्यात सुमारे २ ते ३ लक्ष लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. त्यामुळे दरवर्षी येथेही धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, ज्यात देशभरातून आलेले लक्षावधी बौद्ध लोक सहभागी होतात.

अकोला
सन १९८७ पासून अकोला जिल्ह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा सार्वजनिक पातळीवर सुरू आहे. या सोहळ्याचे नेतृत्व दरवर्षी प्रकाश आंबेडकर हे करत असतात. या दिवशी विशाल मिरवणूक, आखाडे, लेझीम पथके, आकर्षक देखावे, विविध झाक्या, हजारों बौद्धांचा सहभाग, भारतीय बौद्ध महासभेचे शिस्तबद्ध आयोजन, आणि जाहीर सभा असा दरवर्षीचा शिरस्ता असतो.
नागपूरच्या धम्म सोहळ्याचा कार्यक्रम होऊन अनेक अनुयायी बुलढाणा, वाशीम व मराठवाडा भागात परत जाताना अकोला रेल्वे स्टेशनवर मुक्कामी असत, कारण त्याकाळी फार दळणवळणाची साधने नव्हती. या अनुयायांना राहण्याची सोय होईल या प्राथमिक उद्देशाने सन १९८६ साली पहिला धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम अशोक वाटिके समोरील मैदान पोस्ट ऑफीस मागे झाला. नागपूरनंतर संपूर्ण महाराष्ट्रात साजरा होणारा हा भव्य सोहळा ठरला आहे.

Tags: Dhammachakra Pravartan Din 2023Diksha Bhoomi Nagpurdr babasaheb ambedkarNo.1 MaharashtraSo Babasaheb left Hinduism and accepted Buddhism?Why did Babasaheb choose Nagpur to take Dhammadiksha?धम्मदीक्षा घेण्यासाठी बाबासाहेबांनी नागपूरच का निवडले?म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धम्म स्वीकारला?
ADVERTISEMENT
Previous Post

Raj Thackeray on Toll Plaza टोलनाक्यांसाठी शासनाने उचलली महत्त्वाची पाऊले

Next Post

Maratha Reservation मनोज जरांगे पाटील यांची विराट सभा, आरक्षणासाठी सरकारला दहा दिवसांचा अल्टीमेटम

no1maharashtra

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Dhule Crime शासनाची दीड कोटींची फसवणूक, सोनगिरच्या आठ शिक्षकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

13/04/2024
How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

How to view ration card online? रेशन कार्ड ऑनलाईन कसे पाहायचे?

14/05/2023
Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

Dhule Crime सोनगीरच्या एन. जी. बागुल शाळेतील सशयित शिक्षकांना अटक का होत नाही?

03/07/2024
30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

30 boys and girls were caught in the cafe कॅफेमध्ये चाळे करणाऱ्या ३० मुला मुलींना पकडले, भावी पती-पत्नीची वरातही पोलीस ठाण्यात

10/03/2023
Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

Dhule wrestlers won six medals धुळ्याच्या मल्लांनी जिंकली सहा पदकं, जतीन आव्हाळेला गोल्ड मेडल

5
Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

Dhule Crime धुळे शहरात पोलिसांचा धाकच उरला नाही !

5
Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

Dhule Murder News मोहाडीतील सतिष मिस्तरी खून प्रकरणी दोन मिञांना अटक-no1maharashtra

4
mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

mla farukh shah reaction शिवजयंती मिरवणुकीवरील दगडफेकीच्या घटनेवर काय म्हणाले आमदार फारुख शाह? VIDEO ।no1maharashtra

3
Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

Jamie Knight जगप्रसिद्ध फुटबॉलपटू जेमी नाईट यांनी धुळ्यातील शाळकरी खेळाडुंना शिकविल्या फुटबॉलच्या वेगवेगळ्या ट्रिक्स

22/02/2025
Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

Fake Voting बाभळे गावात बोगस मतदान झाल्याचा आरोप

20/02/2025
ADVERTISEMENT

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers

Recent News

नंबर वन महाराष्ट्र ( No.1 Maharashtra) – हे धुळे जिल्ह्यातून सुरु झालेले पहिले राज्यस्तरीय मराठी न्यूज पोर्टल आणि Mobile App आहे. वाचकांची बातम्यांची आणि माहितीची भूक भागविण्यासाठी तयार केलेले डीजिटल युगाचे डीजिटल व्यासपीठ आहे.

Browse by Category

  • Uncategorized
  • अहमदनगर
  • आरोग्य
  • कृषी
  • क्राईम
  • क्रीडा
  • चंदेरी दुनियाँ
  • जगावेगळं
  • जळगाव
  • धुळे
  • नंदुरबार
  • नाशिक
  • पर्यटन
  • योजना
  • राजकारण
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • विशेष लेख

Recent News

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

Dr. Babasaheb Ambedkar भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : नवनिर्मिक महापुरुष

12/04/2025
Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

Dr. Babasaheb Ambedkar Dhule Visit धुळे शहरास दोन वेळेस भेट देणारे डाॅ. बाबासाहेब…

12/04/2025
  • About Us
  • Advertise With Us
  • Contact Us
  • Terms & Conditions
  • Privacy & Policy

Copyright © 2024 No 1 Maharashtra | News Portal Developed by JC Techsoft Solution.

WhatsApp us