कंत्राटी नोकर भरतीची सुरूवात तुम्ही केली, आम्ही नाही!
धुळे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने राज्यभर आघाडी सरकारच्या तेव्हाच्या निर्णयाची बोंबाबोंब सुरू केली आहे. ‘कंत्राटी नोकर भरतीची सुरूवात त्यांनी केली होती, आम्ही नाही’, असे म्हणत जोरदार निदर्शने केली जात आहेत. धुळे शहरात देखील शनिवारी आक्रमक आंदोलन करून जनतेचे लक्ष वेधून घेतले. कंत्राटी नोकर भरतीचा पाया रचणाऱ्या तत्कालीन आघाडी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
भाजपने म्हटले आहे, राज्यात गेल्या २० वर्षांपासून शिक्षण सेवक, कंत्राटी प्राध्यापक, आरोग्य सेवक, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक अशी सर्व पदे हि कंत्राटी पद्धतीने भरली जात होती. आता हीच मंडळी विरोधात जाऊन ‘चोराच्या उलट्या बोंबा’ मारीत आहेत. स्व. विलासराव देशमुख ते पृथ्वीराज चव्हाण व उद्धव ठाकरे याच्या सोबत सहभागी होत वसुली सरकारला आपला पाठींबा दिल्यामुळे तत्कालीन कंत्राटी सरकारनेच अनेक बेरोजगारांची प्रतारणा केली.
महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन सरकारचा भ्रष्ट्राचार उघड करत भंडाफोड केला आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार करण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. धुळे महानगर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांच्या नेतृत्वात भव्य आंदोलन शहरातील महाराणा प्रताप चौकात करण्यात आले. प्रसंगी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा तयार करून त्याचे दहन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पार्टी धुळे महानगराचे जिल्हा अध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महापौर प्रतिभा चौधरी, धुळे लोकसभा संयोजक राजवर्धन कदमबांडे, धुळे विधानसभा संयोजक अनुप अग्रवाल, भीमसिंग राजपूत, जयश्री अहिरराव, किरण कुलेवार, प्रदीप कर्पे, जितेंद्र चौवटीया, ओमप्रकाश खंडेलवाल, यशवंत येवलेकर, संदीप बैसाणे, भारती माळी, संजय बोरसे, राजेंद्र खंडेलवाल, पृथ्वीराज पाटील, प्रथमेश गांधी, नंदू सोनार, आरती पवार, रवी बेलपाठक, डॉ. महेश घुगरी, डॉ. माधुरी बोरसे, विजय पाछापूरकर, राजकुमार बोरसे, बंटी मासुळे, सुनील बैसाणे, नागसेन बोरसे, हर्ष रेलन, वैशाली शिरसाठ, आकाश परदेशी, राजेश पाटील, पप्पू ढापसे, योगेश मुकुंदे, मुन्ना शितोळे, संजय वाडेकर, संगीता पोद्दार, आरती महाले, निशा चौबे, राम अग्रवाल, भागवत चितळकर, रंजना पाटील, वंदना विश्वकर्मा, संगीता पोद्दार, सुनिता सोनार, कशिश उदासी, आशा रावल, अश्विनी सोनार, आरती महाले, योगिता बागुल, हिमानी विश्वकर्मा, बंटी धात्रक, स्वप्नील कुलकर्णी, मोहिनी धात्रक, बबन चौधरी, नीरज देसले, ईश्वर पाटील, करन लोंढे, विनोद खेमनर, रमेश करनकाळ, सुरज चौधरी, बालाजी अग्रवाल, मीनल अग्रवाल, सचिन पाटील, पंकज धात्रक, हर्शल बोरसे, विनय बेहरे, अशोक गवळी, शिवाजी काकडे, राजेश पवार, भिलेश खेडकर, उर्मिला पाटील, भगवान देवरे, सुनील देवर, छोटू थोरात, अशोक गाढवे, प्रशांत गवळी, मयूर गवळी, योगेश सैंदाणे, अजय अग्रवाल, विजय पवार, रवी मगरे, वंदना सूर्यवंशी, दिलीप गवळी, सदा ठाकरे, देविदास वाघ, दीपक कुंठे, राजेंद्र मुसगे, राजेंद्र गांगुर्डे, विशाल सोनावणे, सुनिता सोनार, विजय शिरसाठ उपस्थित होते.