इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे किल्ले देवगिरी संकल्पयात्रेचे आयोजन
धुळे : सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणार्या, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानतर्फे २८ रोजी किल्ले देवगिरी संकल्पयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. देवगिरी (दौलताबाद) किल्ला भ्रमंतीसह, वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढी व शहाजीराजे भोसले स्मारक परिसरात विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. युवा शक्तीचा एकच ध्यास, परिवर्तन अन् शाश्वत विकास या ब्रीदखाली आयोजीत या संकल्पयात्रेत धुळे ग्रामीणमधील हजारो युवक सहभागी होणार असल्याचे, इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंडचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी कळविले आहे.
इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान, बोरकुंड मार्फत अनेकविध समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जातात. युवकांना गडकिल्ले दर्शन व्हावे व त्यातून शिव-प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने, किल्ले देवगिरी संकल्पयात्रेचे दि. २८ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य व गौरवशाली इतिहास अन् शौर्यगाथा प्रत्यक्ष अनुभवता यावी म्हणुन, दरम्यान वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढी व शहाजीराजे भोसले स्मारकास भेट देऊन अभिवादन करण्यात येणार आहे. युवकांमध्ये देश-धर्माप्रती आदर वृद्धिंगत व्हावा व ही संकल्प यात्रा वैचारिक परिवर्तनाची नांदी ठरावी, या उद्देशाने सदर मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.
या संकल्प यात्रेअंतर्गत किल्ले देवगिरी भ्रमंतीसह, वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढी व शहाजीराजे भोसले स्मारक परिसरात होणार्या विविध सांस्कृतीक कार्यक्रमांतून शिवविचारांचा जागर होणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर आयोजित या संकल्पयात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी केले आहे.
किल्ले देवगिरी संकल्पयात्रेचा शुभारंभ दि. २८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७:३० वाजता बोरकुंड- चौफुली, धुळे – चाळीसगाव रोड येथून होईल. दुपारी १२ वाजता वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढी, शहाजीराजे भोसले स्मारकास अभिवादन करणेत येईल. संकल्पयात्रेचे चाळीसगाव, कन्नड मार्गे देवगिरी(दौलताबाद) येथे दुपारी १२:३० वाजता आगमन होईल. दुपारी ३ ते ६ वाजेदरम्यान किल्ले दर्शन(भ्रमंती) करण्यात येईल. सायंकाळी ६:३० ते ८.३० वाजेदरम्यान विविध सांस्कृतीक कार्यक्रम होतील. तर रात्री १० वाजता संकल्पयात्रेचे धुळ्याकडे प्रस्थान होईल. या संकल्पयात्रेबाबत अंकुश देवरे- 86983 24105, शशिकांत पाटील- 94236 74675 व किरण मराठे- 84088 08924 या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. ही किल्ले देवगिरी संकल्पयात्रा धुळे ग्रामीणचे युवक व ग्रामस्थांच्या मनात शिवचेतना जागवणारी ठरणार असुन, यात हजारो युवक सहभागी होणार असल्याचे आयोजक इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान, बोरकुंडचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाणे यांनी कळविले आहे.
हेही वाचा