झोपडपट्टीतील गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी अभ्यासिका
धुळे : महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी-सुविधा विकास योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक तीन देवपूर विटाभट्टी येथे अभ्यासिका बांधणे कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांचे हस्ते शनिवारी करण्यात आला.
धुळे शहरातील देवपूरात अभ्यासिका नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होते. शिवाय विटाभट्टी सारख्या झोपडपट्टी परिसरात घरांचा आकार लहान असतो. मुलांना अभ्यासाकरिता योग्य वातावरण घरात नसते. ही गरज ओळखून आमदार फारुख शाह यांनी विटाभट्टी परिसरात अभ्यासिका उभारण्याचा चांगला निर्णय घेतला. तसेच बांधकामासाठी 25 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला.
धुळे शहरात विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका नसल्यामुळे स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांच्या अभ्यासासाठी गरुड वाचनालय येथे जावे लागाते. लांब अंतर आणि वेळापत्रकाच्या बंधनानुसार अनेक विद्यार्थ्यांना फार अडचणीचे होते. ही अडचण पाहता आमदार फारुक शाह यांनी धुळे शहराच्या विविध भागात विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व वाचनालयाची आवड निर्माण व्हावी व स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी शहरातील विविध भागात चार ठिकाणी अभ्यासिका मंजूर करून घेतली. याआधी शहरात भाजप नगरसेविकेच्या प्रभागात एका अभ्यासिकेचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. देवपूर भागात दुसरी अभ्यासिका बांधण्यात येत आहे. या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. विद्यार्थ्यांनी आणि देवपूर भागातील नागरिकांनी आ. फारुख शाह यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला नगरसेवक नासिर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गणी डॉलर, कैसर अहमद, डॉ. दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, महेमुना अन्सारी, निजाम सय्यद, हलीम शमसुद्दिन, डॉ. बापुराव पवार, आसिफ शाह, अल्ताफ पिंजारी, सुफी हाजी, फकिरा बागवान, नजर पठाण, सउद आलम, अबरार शाह, जुबेर शेख, अकिब अली सैय्यद, शहजाद मन्सूरी, अब्दुल रहीम शेख, आरिफ खान, गबा मिस्तरी, रियाज शाह, मोईन खान, साजिद शेख, हबीब अन्सारी, जावेद मिर्झा, आसिफ शेख, नईम शेख, सलमान अन्सारी, सादिक पठाण, समीर शाह, एकलाक अन्सारी, फैसल अन्सारी यांच्यासह नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा