मराठा समाज आरक्षण लढ्याला पाठींबा देण्यासाठी काँग्रेसचा शेतकरी मेळावा रद्द
धुळे : मराठा समाजाच्या आरक्षण लढ्याला पाठींबा म्हणून 29 ऑक्टोबर रोजी धुळ्यात होणारा काँग्रेस पक्षाचा ‘शेतकरी मेळावा’ रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील हे गेल्या चार दिवसापासून आरक्षण मिळावे म्हणून उपोषण करीत आहेत. मात्र राज्यातील सरकारने अद्याप कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे राज्यात मराठा समाजाचे शांततेत आंदोलन सुरु आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून धुळ्यातील शेतकरी मेळावा रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या उपस्थीतीत 29 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 6 वा. धुळे येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळावा रद्द करण्यात आला असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आ. कुणाल पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा