किल्ले देवगिरी संकल्पयात्रेत धुळे तालुक्यातून लोटला जनसागर
धुळे : इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान, बोरकुंड आयोजीत किल्ले देवगिरी संकल्पयात्रेस धुळे तालुक्याने उदंड प्रतिसाद दिला. यावेळी उभ्या तालुकाभरातून मोठा जनसागर लोटला होता. वेरुळ या शिवरायांच्या मूळ गावी शिवविचारांचा जागर करण्यात आला. यात वेरुळ येथे शिवव्याख्याते जितेंद्र सोनवणे यांचे शिवव्याख्यान व प्रसिध्द शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा शौर्य पोवाड्यांचा कार्यक्रम संपन्न झाला. दरम्यान प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांच्यासोबत, तालुक्यातील जनतेने किल्ले देवगिरीची भ्रमती केली.
६ वर्षाच्या जयेश समाधान आयनोर (सडगांव) या लहानग्यापासून, तर ८३ वर्षांच्या दगाजी पाटील(नावरा) या वयोवृध्दांपर्यंत तालुक्यातील हजारों ग्रामस्थांनी या संकल्पयात्रेत सहभाग घेतला. वेरुळ येथील मालोजीराजे भोसले गढी व शहाजीराजे भोसले स्मारकास भेट देऊन अभिवादन करण्यात आले.
इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान, बोरकुंड मार्फत अनेकविध समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबविले जातात. यातच युवकांना गडकिल्ले दर्शन व्हावे व त्यातून शिव-प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने, किल्ले देवगिरी संकल्पयात्रेचे दि. २८ ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवगिरी (दौलताबाद) किल्ला भ्रमंतीसह, छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य व गौरवशाली इतिहास अन् शौर्यगाथा प्रत्यक्ष अनुभवता यावी म्हणुन वेरुळ येथे भेट देण्यात आली. युवकांमध्ये देश-धर्माप्रती आदर वृद्धिंगत व्हावा व ही संकल्प यात्रा वैचारिक परिवर्तनाची नांदी ठरावी, या उद्देशाने सदर मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. युवा शक्तीचा एकच ध्यास, परिवर्तन अन् शाश्वत विकास या ब्रीदखाली आयोजीत या संकल्पयात्रेत धुळे ग्रामीणमधील हजारो युवक व ग्रामस्थ सहभागी झाले. कोजागिरी पौर्णिमेच्या पावन पर्वावर या संकल्पयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. किल्ले देवगिरी संकल्पयात्रेचा शुभारंभ दि. २८ ऑक्टोंबर रोजी सकाळी ७:३० वाजता बोरकुंड-चौफुलीवरुन करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे व विविध मान्यवर उपस्थित होते. या संकल्पयात्रेत धुळे तालुक्यातून मोठा जनसागर लोटला होता. वेरुळ या शिवरायांच्या मूळ गावी, मालोजीराजे भोसले गढी व शहाजीराजे भोसले स्मारकाच्या परिसरात झालेल्या व्याख्यानात शिवव्याख्याते जितेंद्र सोनवणे यांनी पुप्ष गुंफले. यावेळी शिवविचारांवर प्रकाशझोत टाकत त्यांनी हिरकणीची शौर्याकथा सांगितली. तसेच प्रसिध्द शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांनी सादर केलेल्या पोवाड्यात शिवचेतना व स्फूर्ती जागवल्या. देवगिरी परिसरात तालुकावासियांनी स्वच्छता मोहीमही राबवली. तालुक्यातील या संकल्पयात्रेत जनतेने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविल्याने वेरुळ व देवगिरी(दौलताबाद) या स्थळांना यात्रेचे स्वरुप आले होते. किल्ले देवगिरी संकल्पयात्रा धुळे ग्रामीणचे युवक व ग्रामस्थांच्या मनात शिवचेतना जागवणारी ठरली. इंदुबाई भदाणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब भदाणे यांनी तालुक्यातील जनतेसाठी हा प्रेरणादायी उपक्रम राबविल्याबद्दल तालुकावासियांनी समाधान व्यक्त केले आहे.
शिवरायांच्या पुण्यभूमीतुन युवकांनी शिवप्रेरणा घ्यावी
अवघ्या महाराष्ट्राचे स्फूर्तीस्थान छत्रपती शिवराय यांचे मूळ गाव वेरूळ, या पुण्यभूमीतुन युवकांनी शिवप्रेरणा घ्यावी. तसेच यादवकालीन अजिंक्य किल्ले देवगिरीची भ्रमंती करून, आपल्या पूर्वजांचा जाज्वल्य इतिहास मनामनात रुजवत वैचारिक परिवर्तनासाठी सज्ज व्हावे. असा प्रामाणिक हेतू या संकल्प यात्रेच्या आयोजनामागे होता आणि त्याला धुळे तालुक्यातील युवकांनी प्रचंड प्रतिसाद दिला याचे समाधान वाटते. – बाळासाहेब भदाणे (अध्यक्ष- इदुबाई भदाणे प्रतिष्ठान, बोरकुंड)
संबंधित छायाचित्रे…
हेही वाचा