गंगामाई काॅलेजमध्ये बी फार्मसी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘फ्रेशर्स पार्टी’
धुळे : गंगामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष बीफार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांचे कलागुण सादरीकरण करण्यासाठी संधी देण्यात आली.
शैक्षणिक,सामाजिक आणि स्पर्धेत यश संपादन करण्यास उच्चित ध्येय व कठोर परिश्रम केल्यास यश आपल्या समोर स्वतःहून उभे राहते. विद्यार्थ्यांनी कॉलेज जीवनात आपलं ध्येय निश्चित करून त्यादिशेने जिद्द,अथक मेहनत करावी असे संस्थेचे सचिव माननीय बाळासाहेब मनोहरजी भदाने यांनी मार्गदर्श केले.
डॉ. वैभवकुमार जगताप यांनी भविष्यात वाटचाल करत असताना विविध कौशल्य विकासाची गरज असते. महाविद्यालयातील अध्ययन-अध्यापन प्रक्रिया विद्यार्थी केंद्रित असल्याकारणाने विविध कलागुण विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका असते. विद्यार्थ्यांनी जबाबदारीचे भान ठेऊन भविष्याची वाटचाल करावी याबाबत मार्गदर्शन केले.
प्रा. शलाका बोरसे व प्रा. कुणाल पाटील यांनी कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम बघितले.
या कार्यक्रमाला संस्थेचे प्राचार्य डॉ. वैभवकुमार जगताप, उपप्राचार्य डॉ. सुफियान अहमद, विविध विभाग प्रमुख डॉ. तबरेज मुजावर, डॉ. विनोद वाघ, प्रा. गोपीचंद भोई, डॉ. निलेश शिसोदे, प्रा.कुंदन देवरे, प्राध्यापक सज्जाद हुसेन, अन्य प्राध्यापक डॉ. जयश्री पाटील, डॉ. निलेश सिसोदे, डॉ. भुषण माळी, डॉ. ज्योत्सना खेडेकर, आसिफ अन्सारी, तुषार साळुंखे, अन्वर चौधरी, कुणाल पाटील, श्वेता यादव, हर्षदा बाफना, जयश्री पावरा, सौंदर्या पाटील, आकांक्षा मोरे व इतर शिक्षक उपस्थित होते.
हेही वाचा