धुळे शहरात अतिक्रमण मोहिमेमुळे राजकीय आरोप
धुळे : शहरात रस्ते वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या दुकानांचे अतिक्रमण आणि हाॅकर्स हटविण्याची मोहीम सध्या जोरात सुरूआहे. परंतु अतिक्रमण हटविताना ठराविक एरिया आणि ठराविक लोकांना टार्गेट केले जात असून, अतिक्रमणाच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करण्याचा भाजपचे सत्ताधारी करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी केला आहे. परंतु शहरातील विविध रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सर्व जाती-धर्माच्या लोकांवर होत असताना जातीय तेढ निर्माण करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा हा आरोप बिनबुडाचा आहे की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी महानगरपालिकेसह पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. त्यानंतर ‘नंबर वन महाराष्ट्र’ च्या प्रतिनिधीने याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रणजीत राजे भोसले निरुत्तर झाले होते. परंतु स्वतःला सावरत ते म्हणाले की, “अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे जातीय तेढ निर्माण होईल असे मला वाटते. तुम्ही मला नंतर भेटलात तर तुम्हाला तसा डेमो दाखविला जाईल.”, असे उत्तर त्यांनी दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धुळे शहरात अतिक्रमण हटावच्या नावाखाली तणाव निर्माण करुन जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न काही समाजकंटक करीत आहेत. अतिक्रमणाच्या आडून दगल घडवली जावू शकते, अशी शंका राष्ट्रवादीला आली आहे.
जातीयवादी पक्षाच्या काही नेत्यांचा आदेशाने मनपाचे अधिकारी चुकीच्या पध्दतीने अतिक्रमण काढत आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढले जात आहे. ठराविक भागांमध्येच अतिक्रमण काढून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम काही लोक करीत आहेत. यामुळे शहरात धार्मिक वातावरण खराब होत आहे. शहरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अतिक्रमणाच्या मागे काही दंगल घडविण्याचा हेतू तर नाही ना? याचा ही तपास करावा. सध्या सणासुदीचे दिवस आहेत. यामध्ये काही लोक गालबोट लावण्याचे प्रयत्न करू शकतात. अशा लोकांचा व अनिधिकृत अतिक्रमणाच्या मागील कटकारस्थानी लोकांचा तपास करुन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे.
यावेळी रणजीत राजे भोसले, जितू पाटील, नगरसेवक अन्सारी, वसीम बारी, मुक्तार मन्सूरी, जमीर शेख, यशवंत डोमाडे, गोरख शर्मा, भिका नेरकर, डॉमनिक मलबारी, शकीला बक्ष, उषा पाटील, रईस काझी, अशोक धुळकर, विश्वजित देसले, राजेश तिवारी, मंगलदास वाघ, राजू चौधरी, कुणाल वाघ, दीपक देवरे, भटू पाटील, राजेंद्र सोलंकी, भूषण पाटील, भूषण मोहाडी, आकाश बैसाणे, भूषण पाटील, प्रणव भोसले, समद शेख, अमित शेख, चेतना मोरे, निखिल मोमाया, सागर चौगुले, असलम खाटीक, बरकत शहा, सोनू घारु, हाजी हासीम कुरेशी, फिरोज पठाण, तस्वर बेग, मंगलाताई नवसारे, छायाताई सोमवंशी, जयश्री घेटे, जावीद बेग, नुरुद्दीन शाह, रामेश्वर साबरे, इरफान पठाण, ललित पाटील, चेतन पाटील, मयूर शिंदे, मयूर चौधरी, अभिजित पाटील, युसूब शेख, अंबर मालचे उपस्थित होते.