प्रसिद्ध सर्जन डॉ. रवी वानखेडकर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
धुळे : येथील सुप्रसिध्द शल्यचिकित्सक डॉ. रवी वानखेडकर यांना आयएमएच्या ॲकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटीचा मानाचा समजला जाणारा वैद्यकीय शिक्षण व संशोधन राष्ट्रीय वक्तृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना आयएमए ॲकॅडमी ऑफ मेडिकल स्पेशालिटीच्या कोझीकोडे (कालीकत) केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय परिषदेत सन्मामाने प्रदान करण्यात आला.
‘रिसेंट ॲडव्हान्सेस इन एनोरॅक्टल सर्जरी’ अर्थात गुदामार्गाच्या विविध आजारांवरच्या शस्त्रक्रियाच्या नवनवीन तंत्रज्ञानावरील व्याख्यानासाठी हा पुरस्कार देण्यात आला.
डॉ. रवी वानखेडकर हे गेल्या 32 वर्षापासून खान्देशात एक नामाकिंत शल्यचिकित्सक आहेत. तसेच त्यांचे ‘सेंटर्स फॉर एक्सलेंस फॉर एनोरॅक्टल ॲण्ड लेजर सर्जरी’ हे गेली 20 वर्षापासून सिताराम हॉस्पीटल गल्ली नं. 6 येथे रूग्णांची सेवा करीत आहे. संपुर्ण उत्तर महाराष्ट्रातील सर्व अत्याधुनिक यंत्र सामुग्रीव्दारे शास्त्रोक्त पध्दतीने मुळव्याध, फिशर, फिटयुला इत्यादी आजारांवर अत्यंत सुलभ पध्दतीने उपचार केले जातात व हजारो रुग्णांनी त्याचा लाभ घेतला आहे. त्यासाठी त्यांनी जर्मनी, इस्त्राईल, सिंगापुर देशातुन विशेष प्रशिक्षण प्राप्त् केले आहे.
डॉ. वानखेडकर हे धुळे शासकीय महाविद्यालयात गेली 32 वर्ष विद्यादानाचे काम करीत आहेत. तसेच त्यांनी आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्षपद, सार्क परिषदेचे अध्यक्षपद, जागतिक वैद्यकीय संघटनेचे कोषाध्यक्ष पद व इतर अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरची पदे भूषविली आहेत.
त्यांच्या या पुरस्कराबद्दल इंडियन मेडीकल असोसिएशन धुळे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, उपाध्यक्ष डॉ. सुरेश वसईकर, कार्यकारी अध्यक्ष डॉ. नारायण गलाणी, सचिव डॉ. अभिजीत शिंदे व सर्व सभासदांनी अभिनंदन केले आहे.