धुळ्यात 15 नोव्हेंबरपासून पंडित प्रदीप मिश्रा यांची शिव महापुराण कथा
धुळे : महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दादा भुसे यांनी धुळे महानगरीत सुप्रसिद्ध कथा प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचन सोहळ्याचे आयोजन केले आहे. 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर असे पाच दिवस हा प्रवचन सोहळा हिरे वैद्यकिय कॉलेज नजीकच्या प्रांगणात होणार आहे.
या सोहळ्यास भाविक, भक्त बंधू व भगिनींची उपस्थिती लागणार असून त्या संदर्भात सुयोग्य नियोजनासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांची व्यापक बैठक अग्रवाल विश्राम भवन येथे झाली. या बैठकीत धुळे लोकसभेचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी उपस्थितांना आश्वस्थ केले. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगाव येथील महशिवपुरान कथा यशस्वी केल्याचा दाखला देत, धुळे महानगर देखील शिव महापुराण कथा प्रचंड प्रमाणात यशस्वी होईल, माझ्या मनात यतकिंचितही शंका नसल्याचा निर्वाळा दिला.
या बैठकीत धुळे भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी पूर्ण क्षमतेने हा प्रवचन सोहळा यशस्वी करू व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तांना सेवा देतील असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख राजवर्धन कदमबांडे, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, उद्योजक विनोद मित्तल, महापौर प्रतिभा चौधरी, शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज मोरे व सतीश महाले, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाप्रमुख कैलास चौधरी, भाजप विधानसभा निवडणूक प्रमुख अनुप अग्रवाल, युवा मोर्चा अध्यक्ष आकाश परदेशी, महिला मोर्चा अध्यक्षा वैशाली शिरसाट, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, सरचिटणीस यशवंत येवलेकर, सरचिटणीस संदीप बैसाणे, उद्योग आघाडी विधानसभा निवडणूक प्रमुख राकेश अग्रवाल, प्रदेश महिला मोर्चा उपाध्यक्ष जयश्री अहिरराव, कामगार आघाडी उपाध्यक्ष नरेंद्र हिरे, युवा मोर्चा संघटन सरचिटणीस पंकज धात्रक, महिला मोर्चा संघटन सरचिटणीस मोहिनी धात्रक, महिला कामगार आघाडी अध्यक्ष सोनार, नगरसेविका कल्याणी अंपळकर, नगरसेवक शशी मोगलाईकर, नगरसेवक राजेश पवार, आझाद नगर मंडळ अध्यक्ष बबन चौधरी, अग्रवाल नगर मंडळ अध्यक्ष ईश्वर पाटील, साक्री रोड मंडळ अध्यक्ष भिलेश खेडकर, उपाध्यक्ष निशा चौबे,उपाध्यक्ष गीता कटारिया उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपाध्यक्ष अनिल थोरात, देवपूर पूर्व मंडळ अध्यक्ष सुबोध पाटील, चेतन मंडोरे, बंडू चौगुले, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष अण्णा खेमनार, रमेश करनकाळ, आकाश अग्रवाल, प्रकाशचंद्र उबाळे, ह. भ. प. अशोक गाढवे, शेखर कुलकर्णी, ॲड. किशोर जाधव, प्रदीप पानपाटील, विवेक कुलकर्णी, सनी वाडेकर यांच्यासह भाजप युवा मोर्चा व महिला मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.