मूळ राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगलेली नव्हती. अजित पवार, छगन भुजबळ, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दोंडाईचा येथे पक्षाचा मोठा मेळावा झाला होता. या मेळाव्याला दोंडाईचाचे शहराध्यक्ष ॲड. एकनाथ भावसार यांना कुठेही स्थान दिले नव्हते किंवा मेळाव्याचे आमंत्रणही नव्हते. या मेळाव्यात एका प्रस्थापित नेत्याने राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.ॲड. एकनाथ भावसार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शिंदखेडा तालुक्यातील प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. काही प्रस्थापितांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन खिळखिळे करण्याचा डाव त्यांनी अजित पवारांच्या दोंडाईचा येथील जाहीर सभेपुढे उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. प्रामाणिक कार्यकर्त्यांना कसे डावलले जाते हे त्यांनी उघड केले होते. त्यांच्या या प्रयत्नांची मेन स्ट्रीम मीडियाने दखल घेतली होती. अशा या प्रामाणिक पदाधिकाऱ्याला पक्ष नेतृत्वाने न्याय दिल्याची प्रतिक्रिया जनसामान्यांमधून उमटत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोंडाईचा शहराध्यक्षपदी पुनश्च ॲड. एकनाथ भावसार यांची निवड
धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar Group) पार्टीच्या दोंडाईचा शहराध्यक्षपदी पुनश्च ॲड. एकनाथ भावसार यांची निवड झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने, जिल्हा निरीक्षक उमेश पाटील यांच्या सूचनेनुसार, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
ॲड. एकनाथ भावसार यांनी आपल्या वकीली क्षेत्राच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांतील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. शहरात व परिसरात सामाजिक, राजकीय व आध्यात्मिक कार्यात अग्रेसर असून, विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत दोंडाईचा शहराध्यक्षपदी त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. याबद्दल त्यांचा पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जुने व नवे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन येत्या काळात पक्ष अधिक मजबूत करू, अशी प्रतिक्रिया ॲड. एकनाथ भावसार यांनी दिली.
त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा निरीक्षक उमेश पाटील, धुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे, माजी जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस संदिप बेडसे, धुळे शहर जिल्हाध्यक्ष रणजीतराजे भोसले, जिल्हा कार्याध्यक्ष ललित वारूळे, साक्री तालुकाध्यक्ष गिरीश नेरकर, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव ठाकरे, प्रभारी शिंदखेडा तालुकाध्यक्ष डॉ. कैलास ठाकरे, किसान सेलचे उपाध्यक्ष गुलाबराव पाटील, सामाजिक न्याय ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयाराम कुवर, सोशल मीडिया प्रमुख हरीश मंडलिक, मधुकर तावडे, गुलाबराव धनगर, देवा ठाकरे, भुषण पाटील, राजेंद्र बडगुजर, दादाभाई कापूरे, रतीलाल पाटील, मुश्ताक शहा, छोटु सैंदाणे यांच्यासह अनेक पदधिकारी व कार्यकर्त्यांनी ॲड. एकनाथ भावसार यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोष केला.
हेही वाचा