दिवंगत चंद्रकांत गुजराथी यांना भाजपतर्फे श्रध्दांजली
धुळे : भाजपचे धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी दिलेल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान व हिंदुत्ववादी विचारसरणीचे कट्टर पदाधिकारी माजी महानगर सरचिटणीस स्व. चंद्रकांत नारायणदास गुजराथी उर्फ चंदुकाका गुजराथी यांचे निधन भाजपा परिवाराला, समस्त हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना चटका लाऊन गेले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता म्हणुन त्यांनी आपली सुरुवात केली. तदनंतर संघ परिवाराशी त्यांचा निकटचा संबंध जुळला. संघाने व भाजपने दिलेल्या आदेशाचे पालन त्यांनी केले. राम मंदिर उभारण्याचे आंदोलन, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ निर्मीतीचे आंदोलन असो की, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बाबींचे आंदोलन असो, स्व. चंदु गुजराथी यांनी प्रत्येक आंदोलनात स्वत:ला झोकुन दिले. आंदोलनात भाग घेत असतांना विरोधी पक्षाच्या सरकारच्या निषेधार्त दिलेल्या गगणभेदी घोषणांनी सर्व परिसर दणाणुन सोडायचे. निस्सीम व निस्वार्थी भावनेने त्यांनी अनेक वेळा भाजपेतर विरोधी सरकारचा निषेधार्थ आंदोलनात त्यांचा सहभाग होता.
आपल्या पक्षात पद मिळावे किंवा आर्थीक लाभ मिळावा या हेतुने स्व. चंदु गुजराथी कधीच जिवन जगले नाहीत. त्यांच्यावर अंत्यसंस्कार होताना सर्वांचे डोळे डबडबले. असा कार्यकर्ता पुन्हा होणे नाही. अशी भावना सर्व नेते व कार्यकर्त्यांची होती.
धुळे महानगर भाजप अध्यक्ष गजेंद्र अंपळकर व सर्व लोकप्रतिनीधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने स्व. चंदुकाका गुजराथी यांना भावपुर्ण श्रध्दांजली.