ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बाळासाहेब भदाणे मित्र परिवाराची सरशी
धुळे : तालुक्यातील विविध ग्रामपंचायत पोट निवडणुकीचा निकाल आज (दि. ६) घोषीत झाला. यात बाळासाहेब भदाणे मित्र परिवाराची सरशी झाली. कापडणे, सोनगीर, तरवाडे या गावांच्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बाळासाहेब भदाणे मित्र परिवाराने मुसंडी मारल्याने, तालुक्यात पुन्हा एकदा मित्र परिवाराचे वर्चस्व सिध्द झाले.
धुळे तालुक्यातील सोनगीर, तरवाडे, कापडणे, मांडळ आदी ग्रामपंचायतींच्या रिक्त जागांसाठी काल (दि. ५) पोट निवडणूक संपन्न झाली. या पोट निवडणुकीत बाळासाहेब भदाणे मित्र परिवार गटाने सरशी मिळवली. बोरी पट्टयासह धुळे तालुक्यातील विविध गावांमध्ये, बाळासाहेब भदाणे यांनी केलेल्या समाजाभिमूख विकास कामांनी प्रभावीत होत विविध गावांनी अजून कौल दिल्याचे आज पुन्हा दिसून आले.
आज लागलेल्या पोट निवडणूकीच्या निकालात सोनगीर येथील सरपंच पदाचे उमेदवार रंजना शामलाल मोरे, कापडणे येथील श्रध्दा जितेंद्र पाटील तसेच तरवाडे येथील दत्तात्रय विक्रम पाटील यांनी अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत बाजी मारली. त्या-त्या गावातील जनतेने बाळासाहेब भदाणे मित्र परिवार गटाच्या विकासात्मक वाटचालीवर विश्वास ठेवत कौल दिल्याने बाळासाहेब भदाणे गटाची तालुक्यात पुन्हा एकदा सरशी झाली.
यापूर्वी झालेल्या निवडणुकीत बोरकुंड, रतनपुरा, कुळथे, होरपाडे, चांदे, सिताणे, तिखी, मांडळ, हडसुणे, आदी गावांवर वर्चस्व सिध्द केले आहे. आज लागलेल्या धुळे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक निकालात बाळासाहेब भदाणे मित्र परिवाराने सरशी मिळविल्यानंतर बाळासाहेब भदाणे व जि.प.सदस्या शालिनीताई भदाणे यांनी नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचा सन्मान केला.
यावेळी माजी जि. प. सदस्य श्यामलाल मोरे, पंचायत समिती उपसभापती देवेंद्र माळी, सदस्य चेतन चौधरी, माजी सदस्य अविनाश महाजन आदी उपस्थित होते. या गावांसह तालुक्यातील सर्व गावांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील राहील असे ग्वाही यावेळी बाळासाहेब भदाणे यांनी बोलतांना दिली.