छत्रपती शिवाजी नगर येथे आ. शाह यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप
धुळे : शहरातील आ.फारुख शाह यांच्या हस्ते शिवाजीनगर झोपडपट्टी येथे दुकान नंबर 32 येथे दीपावलीनिमित्त आनंदाचा शिधा वाटपाचा कार्यक्रम झाला.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात गरिबांना दीपावली निमित्त शिधा वाटप केले जाते. शहरातील संपूर्ण रेशन दुकानात गरिबांना शिधा वाटप व्हायला पाहिजे व सर्वांना दिवाळीच्या फराळासाठी शिधा उपलब्ध व्हावे म्हणून धुळे शहरात आ. फारुख शाह यांनी रेशन दुकानदारांची भेट घेऊन लाभार्थी गरिबांना शिधावाटप होत आहे किंवा नाही याची पाहणी केली व धुळ्यातील शिवाजीनगर झोपडपट्टी येथील दुकान नंबर 32 येथे शिधा वाटपाचा कार्यक्रम झाला.
आ. फारुख शाह यांच्या प्रयत्नामुळे धुळे शहरातील 22000 नागरिकांना रेशन कार्ड ऑनलाइन होऊन अन्नधान्य उपलब्ध होत आहे. तसेच दिव्यांग, परित्यक्ता, विधवा व वृद्धांना शासनाच्या योजनेतून कसा लाभ देता येईल यासंदर्भात आ. फारुख शाह यांनी पुरवठा मंत्री यांच्याकडून शहरवासीयांसाठी ज्या रेशन कार्डधारकांना धान्य उपलब्ध होत नव्हते अशांसाठी आमदार कार्यालयातून नागरिकांचे अर्ज व फार्म उपलब्ध करून पुरवठा विभागाला सादर केले व आज शेकडो नागरिकांना लाभ होत आहे.
दिवाळीनिमित्त आ. फारुख शाह यांचे हस्ते शिधा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेस पुरवठा विभागातील पुरवठा निरीक्षणाधिकारी मायानंद भामरे व दुकानदार चौधरी उपस्थित होते.